Viral Letter sakal
Trending News

Viral Letter : "दोन दिवसानंतर सुट्टी पाहीजे, आई मरणार आहे" धक्कादायक Application व्हायरल

या शिक्षकाने दोन दिवसापूर्वीच आई मरणार असल्याची भविष्यवाणी सांगत सुट्ट्यांसाठी अर्ज केलाय.

सकाळ डिजिटल टीम

जॉब लाईफ मध्ये सुट्टी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जॉब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टींसाठी अर्ज करावा लागतो. जसे की फिरायला जायचे असेल किंवा ठराविक कामासाठी कुठे जायचे असेल तर आधीच सुट्टीचा अर्ज करावा लागतो पण काही सुट्ट्या अशा असतात ज्या अचानक घ्याव्या लागतात. जसे की आजारी पडणे, कुणाचा मृत्यू होणे किंवा अचानक कोणतेही महत्त्वाचे काम येणे, अशावेळी अचानक सुट्टी घ्यावी लागते.

सध्या असाच एक सुट्टीचा अर्ज व्हायरल होतोय. हा सुट्टीचा अर्ज एका शिक्षकाचा आहे. या शिक्षकाने दोन दिवसापूर्वीच आई मरणार असल्याची भविष्यवाणी सांगत सुट्ट्यांसाठी अर्ज केलाय. सध्या या शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

या शिक्षकाचा सुट्टीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या अर्जात शिक्षकाने लिहिले आहे, " 5 डिसेंबर सोमवारला रात्री 8 वाजल्याच्या जवळपास माझ्या आईचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी 6 आणि 7 डिसेंबर रोजी मला सुट्टी हवी आहे. कृपया माझा अर्ज स्वीकारा"

सुट्टीसाठी जिवंत आईच्या मरणाची भविष्यवाणी करणे, हे खूप धक्कादायक आहे. या शिक्षकाने असं का केलं असावं? हा प्रश्न उपस्थित होतोय. सध्या या व्हायरल अर्जावर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT