Viral Video Sakal
Trending News

ग्राहकांनो सावधान! शिळी भाजी केमिकलमध्ये बुडवून अशी केली जातेय ताजी | Video Viral

दिसतं तसं नसतं म्हणून.... जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : बाजारातील भाज्या ताज्या आणि सकस असल्याचं समजून आपण खरेदी करतो. पण दोन ते चार दिवसांपूर्वी काढलेल्या किंवा उपटलेल्या भाज्या एवढ्या ताज्या कशा राहतात याचा आपण कधी विचार केला आहे का?

केमिकलचा वापर करून भाज्या ताज्या ठेवता येतात याचा आपण कधी विचारही केला नसेल पण सध्या असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केमिकलमध्ये बु़डवल्यानंतर लगेच भाजी ताजी होताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यामध्ये एका बादलीत ठेवलेल्या केमिकलयुक्त पाण्यात शिळी झालेली भाजी बुडवल्यानंतर काही क्षणात ती ताजीतवानी झालेली दिसते. त्यामुळे आता बाजारातील प्रत्येक ताज्या दिसणाऱ्या भाज्या खरोखर ताज्या असतील याची शाश्वती नाही. अशा भाज्या विक्री केल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

भाज्या ताज्या करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल बिहारमधील एका कंपनीत तयार करण्यात येत असल्याची माहिती आहे. तर हे केमिकल भाज्या ताज्या करण्यासाठी तयार करण्यात आले नसून ते पिकावरील फवारणीसाठी तयार करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी अशा ताज्या वर केमिकलयुक्त भाज्या खरेदी करण्यापासून सावध राहायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT