Street light_learning Viral Video 
Trending News

Viral Video : फुटपाथवर दिव्याच्या प्रकाशात अभ्यास; विद्यार्थिनीचे कष्ट पाहून नेटकरी भावूक

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : समाजात असा एक वर्ग आहे जिथल्या मुलांसाठी शिक्षण घेणं किती अव्हानात्मक आहे, याची प्रचिती आपल्याला अधुनमधून येत असते. गरीब वर्गातील ही मुलं रस्त्यांवर वावरताना, सिग्नलवर काही वस्तू विकताना दिसतात. या मुलांच्या नशिबातच जणू शिक्षण नाही. पण या सर्व परिस्थितीतही काही आशेचे किरण आहेत. अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये ती फुटपाथवर रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यासात मग्न झालेली दिसते. (Studying in light of street lamp users emotional after seeing of Viral Video)

रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थीनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यानंतर तो तत्काळ व्हायरल झाला. इन्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून तो अनेकांच्या मोबाईलपर्यंत येऊन पोहोचला. त्यानंतर शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या या चिमुकलीसाठी नेटकरी भावनिक झाले असून तिच्या या कष्टाला त्यांनी दादही दिली आहे.

हा व्हिडिओ रस्त्यानं वाहनातून जाणाऱ्या एका व्यक्तीनं चित्रीत केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या बाजूला कुडाच्या घरांची वस्ती दिसतेय. यामध्ये लाईट नाही, त्यामुळेच रस्त्यावर असलेल्या दिव्याचा वापर ही मुलगी अभ्यासासाठी करत असल्याचं यामध्ये दिसतंय. या व्हिडिओला आत्तापर्यंत ६५ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले असून ५ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. अशीच मेहनती मुलं पुढे जाऊन आपलं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतात, अशी कमेंट एका युजरनं या व्हिडिओवर दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT