Viral  esakal
Trending News

Viral : लोकांच्या दारोदारी जाऊन फूड डिलिव्हरी करणारा तरूण बनला मॉडेल, जिद्द पाहून कराल सलाम!

या तरूणाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याच्या जीवनाचा खडतर प्रवास आणि मिळालेले यश दाखवलेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

 Viral :

यश सहाजासहजी मिळत नाही हेच खरं. त्यामुळेच अनेक लोक दररोज अपयश होतात तर काही मोजकेच यशस्वी होतात. काही लोकांना मेहनत न करता फळ मिळतं तर काहींना कठोर परिश्रम करून यशाचं फळ पदरात पाडावं लागत. अशा काही यशोगाथा दररोज आपल्या कानावरती पडत असतात.

आज आपण अशा एका मुलाला भेटणार आहोत ज्याची यशोगाथा प्रत्येकाला लाजवेल अशीच आहे. ते म्हणतात ना की तुम्हाला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असेल तर देव सुद्धा तुमच्या पाठीशी असतो. असंच काहीसं मुंबईत राहणाऱ्या साहिल सिंह सोबत घडलं आहे. 

साहिल डिलिव्हरी बॉय होता. तो स्विगी या फूड डिलिव्हरी कंपनीत एजंटचे काम करत होता. पण आता तो एक प्रोफेशनल मॉडेल बनला आहे. साहिलचा हा प्रवास कसा पार पडला याबद्दलच जाणून घेऊया. (Viral)

सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ वायरल होत असतात. साहिलने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने त्याच्या जीवनाचा खडतर प्रवास आणि मिळालेले यश दाखवलेला आहे.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत साहिल सांगतो की, शाळा सोडल्यानंतर मी अनेक छोटे-मोठे काम केली. ज्ययात मला १८ ते २२ हजार इतका पगार मिळायचा. साहिलनं शेअर केलेल्या व्हिडिओत, तो एक स्विगी डिलिव्हरी बॉय होता, तो शेफही होता. अन् त्याने अशी बरीच छोटी-मोठी कामे केल्याचे सांगितले आहे.

२००९ मध्ये काहीतरी काम करत असाताना मी एका मॉडेलचा फोटो पाहिला. तेव्हा मला वाटलं की मला जीवनात असंच काहीतरी बनायचंय. तेव्हा मी रस्त्यावर पैशांची पाकिट विकत होतो.

मी फॅशन इंडस्ट्रीमध्ये कसे येऊ शकतो याचे ज्ञान प्राप्त करत होतो. त्याबद्दल अभ्यास करायचो, मी २०० हून अधिक ऑडिशन्स दिल्या. आणि शेवटी माझ्या कष्टाला यश मिळालं. मी Streax साठी पहिलं रॅम्प वॉक केलं.

पुढे तो म्हणतो की, "माझी उंची 5 फूट 10 इंच आहे. ही एका मॉडेलसाठी खूप कमी उंची आहे.रॅम्पवॉकसाठी स्ट्रेक्ससारख्या ब्रॅंडलाही मला वारंवार विनंती करावी लागली. मी हील्स घालण्याच्या अटीवर त्यांनी होकार दिला. माझं ते पहिलं वॉक हिल्स घालून केलं होतं.

सोशल मीडियावर साहिल नव्या मॉडेल्ससाठी टिप्स आणि अनुभव देखील शेअर करतो. त्याने यापूर्वी त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर पुरुषांच्या ग्रूमिंग आणि स्टाइलिंगचे व्हिडिओ शेअर केले आहेत.

साहिलने शेअर केलेल्या व्हिडिओला लाखोंमध्ये व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. अभिनेत्री रिद्धिमा पंडितने साहिलचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT