Surat News Sakal
Trending News

Trending News: 'गणपती'ने वाचवलं; लाटांमुळे समुद्रात हरवला १३ वर्षांचा मुलगा; २४ तासांनी जिवंत सापडला तो असा...

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी हा मुलगा आपल्या घरच्यांसोबत बीचवर गेला होता.

वैष्णवी कारंजकर

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, ही म्हण तर आपल्याला माहित असेलच. याचाच प्रत्यय आला गुजरातमधल्या सूरत इथल्या एका मुलाला. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी दुपारी साधारण १ च्या आसपास सूरत शहरातल्या बीचवर एक १३ वर्षांचा मुलगा आपल्या परिवारासह फिरायला गेला होता. तिथे तो समुद्रात खेळायला गेला असताना अचानक दिसेनासा झाला.

समुद्राच्या किनाऱ्यावर उभे असणारे नातेवाईक आणि इतर लोक त्याला मदत करू शकत नव्हते. घरच्यांना तर वाटलं तो मरण पावला, त्यामुळे ते घरी परतले. दुसरीकडे पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून या मुलाच्या शोधात होते. औद्योगिक क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांकडूनही मदत घेण्यात आली. पण पाण्यात बुडलेल्या या मुलाचा काहीच थांगपत्ता लागेना.

आपला मुलगा लखन जिवंत असल्याची आशाच गमावून बसलेल्या नातेवाईकांना मात्र अचानक एक आनंदाची बातमी मिळाली. २४ तास समुद्रात राहूनही लखन नवसारीजवळ जिवंत अवस्थेत सापडला. आपल्या मुलाला अशा कठीण प्रसंगातूनही वाचल्याचं पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले.

समुद्राच्या खोल पाण्यात बुडण्यापासून लखनला वाचवायला गणपती बाप्पाच आले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. लखनला वाचवलं गणपतीच्या एका मूर्तीने. या मूर्तीच्या खालच्या भागामध्ये लखनला आधार मिळाला आणि २४ तासांहून अधिक काळ लखन त्यात बसूनच पाण्यावर तरंगत राहिला. दुसरीकडे सूरत पोलीसांसह सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. स्पीडबोटच्या साहाय्याने त्या लखनचा शोध घेत होत्या, पण त्यांना यश येत नव्हतं.

समुद्रात मासे पकडण्यासाठी जाणाऱ्या मच्छिमारांनी या मुलाला पाहिलं आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला आपल्या बोटीत बसवलं. त्यानंतर मच्छिमारांनी याची माहिती मत्स्यपालन विभागाच्या बिंदू बेन यांना दिली. त्यांनी लगेचच सूरत पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचवली. जवळपास २४ तासांहूनही जास्त काळ हा १३ वर्षांचा लखन देवीपूजक गणेशाच्या मूर्तीच्या आधारे राहिला. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सध्या तो रुग्णालयात उपचार घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT