Thief Sakal
Trending News

काठ्या-तलवारीसह चोर आले, शेतात झोपलेल्या दाम्पत्यावर केले वार अन्...; सशस्त्र दरोड्याचा थरार CCTV मध्ये कैद

महिलेच्या किंचाळण्याचा कर्कश आवाज, दरोडेखोरांचा वावर अन् पळून गेलेला व्यक्ती; थरार पाहून झोप उडेल

सकाळ डिजिटल टीम

पाथर्डी : उन्हाळ्यामुळे थंड हवेत आपणही घराच्या बाहेर झोपत असाल तर सावधान. हा मोह आपल्या जीवावर बेतू शकतो. कारण काही दिवसांपूर्वी एका शेतातील घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला आहे. शेतामध्ये बाहेर झोपलेल्या दाम्पत्यावर या दरोडेखोरांनी काठ्या आणि तलवारीने हल्ला केला असून ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी येथे घडली असल्याची माहिती आहे. चार दरोडेखोरांनी शेतातील घराच्या बाहेर झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ला केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर महिलेच्या किंचाळण्याचा आवाजही यामध्ये येत आहे.

दरोडेखोर आल्यानंतर पहिल्यांदा खाली झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर महिला उठते आणि ओरडू लागते. त्यानंतर महिलेचा पतीही उठतो. पण चार दरोडेखोर त्यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना शांत बसायला सांगतात.

महिला जास्त ओरडत असल्यामुळे एका दरोडेखोराने महिलेच्या तोंडावर लाथ मारल्याचं दिसत आहे. त्यानंतर चारही सशस्त्र दरोडेखोर काही वेळानंतर निघून गेल्याचं सांगण्यात येतंय पण या चोरीचा थरार पाहून अंगावर काटा येईल.

दरम्यान, आपणही थंड हवेसाठी घराच्या बाहेर झोपत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू नसतील याची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपण ग्रामीण भागातील रहिवाशी असाल तर कुत्रे पाळणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा प्रकारचा धोका कमी होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT