Women Creativity: सोशल मीडियावर आपण रोज काहीतरी आगळंवेगळं बघत असतो. बऱ्याचदा अनेक धक्कादायक आणि आश्चर्यजनक गोष्टी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळतात. अशीच एक नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. बार्सिलोनामध्ये एका ३१ वर्षीय महिलेनं तिच्या मासिक पाळीच्या रक्ताविषयी धक्कादायक विधान केलंय. महिलेच्या म्हणण्यानुसार मासिक पाळीच्या रक्ताला ती अमृत समजते. ही महिला नेमकी आहे कोण ते जाणून घेऊया.
ही महिला तिच्या मासिक पाळीचं रक्त केवळ चेहऱ्यालाच लावत नाही तर ती हे रक्त पितेसुद्धा. शिवाय या रक्तानं ती पेंटिंगही करते. या महिलेचं नाव आहे जास्निन एलिसिया. ही महिला बार्सिलोनाला तिच्या पती आणि अडीच वर्षाच्या मुलासह राहाते.
जास्मिन मासिक पाळीच्या रक्ताचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीनं करते. तिच्या मते, मासिक पाळीच्या रक्तात प्रोटीन, आयरन, कॉपर आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात. मासिक पाळीच्या रक्तात रीजनरेटीव सेल्स आणि अँटीमायक्रोबियल असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात असेही तिचे म्हणणे आहे.
मासिक पाळीत या रक्ताचं सेवन केल्याने अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते असेही ती म्हणते. मात्र जे लोक रोज जंक फूड खातात त्यांनी मासिक पाळीतील रक्ताचे सेवन करू नये. जे लोक हेल्दी डाएट फॉलो करतात त्यांनी हे रक्त पिल्यास त्यांना फायदा होईल. जास्मिन म्हणाली की, ती बऱ्याच काळापासून तिच्या मासिक पाळीच्या रक्ताचे सेवन करत आहे. आणि त्यामुळे ती निरोगी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.