TikTok  esakal
Trending News

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

TikTok comback Update: भारत सरकारने जून २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती.

Mayur Ratnaparkhe

TikTok India comeback news as website Starts sparks discussion: भारतात पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा टिकटॉक सुरू होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. कारण,  टिकटॉकची वेबसाइट पुन्हा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर देखील एसच खळबळ उडाली आहे. जरी हे अ‍ॅप अद्याप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध नसले तरी, वेबसाइट पुन्हा सुरू झाल्याने टिकटॉकच्या चाहत्यांसाठी ही मोठी गुड न्यूज आहे आणि त्यांचा आशा जागृत झाल्या आहेत. 

भारत सरकारने जून २०२० मध्ये टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. या निर्णयाचे कारण राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका होता. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने म्हटले होते की हे अ‍ॅप्स भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला प्रतिकूल अशा गोष्टींमध्ये गुंतले होते. तर हा निर्णय अशा वेळी आला जेव्हा भारत-चीन संबंधांमध्ये तणाव शिगेला पोहोचला होता आणि गलवान खोऱ्यातील संघर्षात अनेक भारतीय सैनिक मारले गेले होते.

२०२० पासून भारत आणि चीनमध्ये २४ फेऱ्या झाल्या आहेत, ज्यामुळे सीमा तणाव कमी झाला आहे. दोन्ही देशांमधील विमानसेवा जाहीर करण्यात आल्या आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. अशा परिस्थितीत, टिकटॉकचे पुनरागमन हे एक सकारात्मक संकेत मानले जाऊ शकते.

दरम्यान काही युजर्सनी टिकटॉकची वेबसाइट पुन्हा सुरू होत असल्याची माहिती दिली आहे. तर काहींनी काही वेबसाइट अद्यापही बंदच असल्याचंही म्हटल आहे. शिवाय, काही सबपेज काम करत नसल्याचीही माहिती दिली आहे. यावरून असाही अंदाज लावला जात आहे की, भारतात टिकटॉक टप्प्याटप्प्यात सुरू होत आहे. बाईटडान्सकडून अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. परंतु वेबसाइट परत आल्याने हे स्पष्ट होते की कंपनी भारतात पुन्हा आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

Mumbai Local Megablock: रविवारी रेल्वे प्रवाशांना फटका बसणार, मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक; वेळापत्रकात बदल

SCROLL FOR NEXT