Video Viral Sakal
Trending News

Video Viral : ट्राफिक पोलिसाची गुंडगिरी; तरूणाला भर चौकात घातल्या लाथा

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पोलीसांच्या गुंडगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते भर चौकात एका तरूणाला लाथा आणि कानफडात मारत मारहाण करताना दिसत आहेत. क्रांतीचौकात शनिवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.

अधिक माहितीनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार प्रदीप चव्हाण आणि पोलीस काँन्स्टेबल शहा यांनी एका तरूणाला लाथा आणि चापट मारत मारहाण केली. त्यामागचं कारण अद्याप समजले नाही. पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यावरून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, वाहतुक पोलिसांनी लाच घेतल्याचा पुण्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुचाकीस्वार तरूणाला मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून वाहतुक पोलिसांविरोधात अनेकांनी संताप व्यक्त करत व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

"वाहतूक पोलिसांवर विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न पडलाय... लाच घेणारे, १००, २०० रूपये घेणारे पोलीस पाहिले आहेत पण लाथा बुक्क्यानी मारहाण करणारे पोलीस पहिल्यांदाच पाहतोय." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: पुतीन यांचे 'हे' चार मित्र, ज्यांच्यामुळे पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व संपलं; चीनमधून दिला संदेश

Mumbai News: मुंबईत ईद-ए-मिलादच्या मिरवणुकासाठी रस्ते वाहतूक बदल, पाहा पर्यायी मार्ग

Ravindra Jadeja च्या पत्नीनेही दाखवलं खेळाचं कौशल्य; लहान मुलांसोबत खेळली कबड्डी अन् रस्सीखेच; पाहा Video

Thane Crime: तलाठी कार्यालय चोरी प्रकरण! तपासात धक्कादायक खुलासा उघड; डोंबिवलीत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates: दौंड रेल्वे स्थानकावर प्रवाशाला लुटले

SCROLL FOR NEXT