Mizoram 78 year old man Sakal
Trending News

Trending News: ७८ वर्षांचे आजोबा पुन्हा बसले वर्गात; रोज तीन किलोमीटर चालत जातात शाळेला

ज्या वयामध्ये लोक घरातून बाहेरही पडणं टाळतात, त्या वयात लालरिंगथारा यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे.

वैष्णवी कारंजकर

शिकण्याला कोणतंही वय नसतं, असं म्हणतात. मिझोरमच्या चंफई जिल्ह्यामध्ये राहणारे ७८ वर्षीय लालरिंगथारा यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. ज्या वयामध्ये लोक घरातून बाहेरही पडणं टाळतात, त्या वयात लालरिंगथारा यांनी शाळेत प्रवेश घेतला आहे. त्यांनी नववीमध्ये प्रवेश घेतला आहे. काय आहे याचं कारण?

लहानपणी वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना शिक्षण सोडावं लागलं. पुढे ते आपल्या उदरनिर्वाहासाठी आईसोबत शेतात काम करू लागले. पण जसं त्यांना संधी मिळाली, त्यांनी पुन्हा शिक्षणाची कास धरली आहे. (Trending News)

लालरिंग यांनी सांगितलं की, वडिलांच्या मृत्यूनंतर मला असं वाटलं की माझं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. माझं कुटुंब अनेक संकटांनी ग्रासलं होतं. या संकटांमुळे माझा अभ्यास होऊ शकत नव्हता. जेव्हा १९९५ मध्ये आईसोबत मी दुसऱ्या शहरात राहायला गेलो, तेव्हा पुन्हा एकदा मला शिकावंसं वाटू लागलं. म्हणून मी पाचवीमध्ये प्रवेश घेतला. पण पुढे जाता आलं नाही. म्हणून त्यांनी आता नववीत प्रवेश घेतला आहे. आणि आता त्यांची शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे.

१९४५ साली चंफई जिल्ह्यातल्या खुआंगलेग गावामध्ये लालरिंगथारा यांचा जन्म झाला. आता त्यांचं वय ७८ वर्षे आहे. या वयातही ते न चुकता दररोज शाळेला जातात. ऊन असो वा पाऊस ते तीन किलोमीटर पायी चालत शाळेला जातात. त्यांच्या या निर्णयामुळे शाळाही चर्चेत आली आहे आणि तिथले लोकही खूश आहेत. लालरिंग म्हणतात की त्यांचा उद्देश फक्त एवढाच आहे की त्यांना इंग्रजी लिहायला शिकायचं आहे. त्यांना टीव्हीवर इंग्रजी बातम्या पाहायच्या आणि समजून घ्यायच्या आहेत.

त्यांच्या या प्रयत्नांबद्दल त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना प्रोत्साहन देतात. शाळेकडून त्यांना गणवेश आणि पुस्तकंही देण्यात आली आहेत. लालरिंग यांची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे लालरिंग मिजो भाषा लिहू वाचू शकतात. ते म्हणाले की मिजो भाषा लिहण्या - वाचण्यात मला काही अडचण नाही. मला इंग्रजी भाषा शिकण्याची इच्छा आहे. आजकाल प्रत्येक ठिकाणी इंग्रजी शब्द वापरले जातात. त्यामुळे माझा बऱ्याचदा गोंधळ उडतो. म्हणून मी माझं ज्ञान वाढवण्यासाठी शाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT