Constitution Sakal
Trending News

Trending News: फक्त ९८ पानांचं पुस्तक; पण तुम्ही हातात घेऊन वाचूही शकणार नाही; काय आहे कारण?

हे पुस्तक तयार करण्यासाठी ६ वर्ष लागली आणि आता हे पुस्तक हजारो वर्षांपर्यंत असंच राहणार आहे.

वैष्णवी कारंजकर

आपल्यापैकी प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात विविध प्रकारची पुस्तकं पाहिली असतील. जाड पुठ्ठ्याची, नवी जुनी, पातळ पानांची, जाड पानांची, बारीक अक्षरांची, मोठ्या अक्षरांची. पण कधी तुम्ही पितळेचं पुस्तक पाहिलं आहे का? होय, मध्य प्रदेशातल्या इंदौरमध्ये एका वकिलाने ९८ पानांचं एक पुस्तक तयार केलं आहे. या पुस्तकाचं वजन ५७ किलो आहे. याचा अर्थ तुम्ही हे पुस्तक नेहमीच्या पुस्तकाप्रमाणे निवांत हातात घेऊन नाही वाचू शकत.

इंदौरचे वकील लोकेश मंगल यांनी १९३ देशांच्या प्रतिकांचा समावेश असलेलं ४ फूट लांबीचं हे पितळेचं पुस्तक बनवलं आहे. या पुस्तकाचं वजन ५७ किलो असून यामध्ये ९८ पाने आहेत. पितळेच्या या पुस्तकामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्व १९३ सदस्य देशांच्या संविधानातला काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे या पुस्तकाचं नावही संविधान असं ठेवण्यात आलं आहे. हे पुस्तक पितळेच्या पानावर चित्रं कोरून तयार करण्यात आलं आहे. हे पुस्तक तयार करण्यासाठी ६ वर्ष लागली आणि आता हे पुस्तक हजारो वर्षांपर्यंत असंच राहणार आहे.

२०१७ मध्ये सुरू झालं होतं पुस्तक बनवण्याचं काम

हे पुस्तक तयार करण्याचं काम २०१७ साली सुरु झालं होतं. ६ वर्षांच्या कष्टानंतर २१७ तासांमध्ये या पुस्तकाचं लेझर प्रिंटिंग करण्यात आलं. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी २०० शहरांमधल्या ४२,००० लोकांकडून फक्त एक रुपया आर्थिक मदत म्हणून घेण्यात आला आहे. सात तासांमध्ये ४२ हजार रुपये जमा झाले. हे पुस्तक तयार करणारे वकील लोकेश मंगल यांनी सांगितलं की, आम्हाला अशी गोष्ट बनवायची होती, जी वर्षानुवर्षे टिकेल. १९३ देशांच्या संविधानाला चित्रांच्या माध्यमातून एकत्र करून ठेवण्याचं काम सुरू तर झालं, पण भाषा हे एक मोठं आव्हान होतं. म्हणून आम्ही चित्रांची मदत घेतली. कागदाचं आयुष्य मर्यादित आहे, म्हणून धातूचा वापर करण्याचा निर्णय घेतला.

धर्मगुरुंकडून पितळ या धातूला शुद्ध मानलं गेलं आहे. त्यामुळे हा धातू निवडल्याचंही मंगल यांनी सांगितलं. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ३५० लोकांनी मदत केली आणि जवळपास ६ वर्षे हे काम सुरू होतं.

लोकेश मंगल म्हणाले की, या कामामध्ये सामान्य लोकच नव्हे, तर नेते, प्रशासकीय अधिकारी यांचाही समावेश होता. सुरुवातीला हे काम कमी प्रमाणात सुरू झालं होतं, पण याचा शेवट मात्र भव्यदिव्य झाला. आम्ही हे नक्कीच पूर्ण करू याबद्दल आम्हाला विश्वास होताच. (Trending News)

या पुस्तकाचं पहिलं पान कव्हर म्हणून ठेवण्यात आलं आहे. यावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त त्यांचं जन्मस्थान असलेल्या महू इथल्या प्रतीक चिन्हाचा समावेश कऱण्यात आला आहे. मंगल म्हणाले की, या पुस्तकामध्ये आम्ही प्रामुख्याने प्रत्येक देशाचं राष्ट्रीय चिन्ह समाविष्ट केलं आहे. तिथल्या बँक, आर्मी, नौदल, राष्ट्रीय फळ, पक्षी, झाडे, संस्कृती आणि तिथल्या न्याय व्यवस्थेसह अन्य गोष्टींना या पुस्तकात विशेष स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT