Rich Housewife Sakal
Trending News

Trending News: कोट्यधीशाची बायको असूनही करतेय नोकरी; महिलेचे खुलासे ऐकून हैराण व्हाल!

प्रत्येकाला कोट्यधीश व्हायचं असतं, आय़ुष्य आरामात घालवायचं असतं. पण तेही सोपं नाहीये.

वैष्णवी कारंजकर

जगातल्या प्रत्येकाला वाटतं की त्यानं असं काहीतरी केलं पाहिजे की त्याच्याकडे करोडोंची संपत्ती असेल आणि तो आपलं आयुष्य आरामात बसून घालवू शकेल. विशेष म्हणजे, फक्त काही लोक श्रीमंत होण्यासाठी काम करण्याचा विचार करतात. असेही काही लोक आहेत ज्यांना ही संपत्ती तशीच मिळते.

अशाच एका लक्षाधीशाची पत्नी सोशल मीडियावर आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करत आहे आणि सांगत आहे की असं जगणंही काही कमी कठीण नाही. त्यांनाही पूर्णवेळ काम करावं लागतं.

तुम्ही पण विचार करत असाल की करोडपतीच्या बायकोला नोकरी करायची काय गरज आहे? तिला बसून सर्व काही मिळू शकतं. पेर्निल नावाच्या या महिलेने सांगितलं की ती श्रीमंत गृहिणी बनण्याचं काम करते आणि यासाठी ती अजिबात आळशी राहू शकत नाही. तिला आलिशान सुट्ट्या घालवाव्या लागतात आणि तिला नेहमीच सुंदर आणि सर्वोत्तम दिसावं लागतं, असा अहवाल डेली स्टारने दिला आहे. त्यासाठीही प्रयत्नांची गरज आहे. (Trending News)

पेर्निलने तिच्या टिकटॉक अकाऊंटवर सांगितलं की ती मायकोनोस आणि सेंट ट्रोपेझ सारख्या ठिकाणी सुट्टीसाठी गेली होती. तिथं ती महागड्या ठिकाणी राहायला गेली आणि आलिशान हॉटेल आणि पूलचा आनंद लुटला. महागड्या ब्रँडच्या पर्स खरेदी करण्यात तिने आपला वेळ घालवला. पेर्निलने इथल्या महागड्या नाईट क्लबमध्ये जाऊन अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये कपडे घातले होते.

तिनं सांगितलं की, एक गृहिणी म्हणून तिला साफसफाई आणि स्वयंपाक करण्याची गरज नाही, परंतु तिला नेहमीच टिपटॉप आणि सुंदर दिसावं लागतं. सुंदर दिसणं आणि महागडी खरेदी करणं हे तिचं काम असल्याचं पेर्निल सांगते.

पेर्निलची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक जण कमेंटमध्ये म्हणू लागले की ही नोकरी आहे, त्यामुळे त्यांनाही तीच नोकरी हवी आहे.

एका यूजरने विचारलं - दुबईमध्ये श्रीमंत गृहिणी बनण्यासाठी कुठे अर्ज करावा? एका युजरने म्हटलं - गृहिणीचं पूर्णवेळ काम मुलांची काळजी घेणे आहे. एका युजरने चिडवत लिहिलं – व्वा, किती अर्थपूर्ण जीवन आहे! काही युजर्सनी असंही म्हटलं की त्यांच्याकडे एवढे पैसे असते तर त्यांनी महागडे कपडे आणि पर्स घेऊन जाण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू केला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT