Dolls Eye fruit Sakal
Trending News

Trending News: हे कसलं फळ? डोळ्याच्या आकाराच्या फळाचा फोटो व्हायरल, माणसांसाठी आहे धोकादायक

या फळाला बाहुलीचे डोळे असं म्हणतात.

वैष्णवी कारंजकर

आपल्या पृथ्वीवर हजारो प्रकारची झाडे आणि वनस्पती आहेत. यापैकी काही अशा आहेत की त्यांच्याबद्दल जाणून आश्चर्य वाटेल. अशीच एक अजब वनस्पती अमेरिकेच्या नॅशनल पार्कमध्ये आढळते.

या दुर्मिळ वनस्पतीचा फोटो व्हायरल झाला आहे. ही वनस्पती अशी आहे की त्याचं फळ बाहुलीच्या डोळ्यासारखं दिसतं. हे फळ माणसांसाठी अत्यंत धोकादायक आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती.

अमेरिकेच्या शेननडोह नॅशनल पार्कमध्ये असलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीचे छायाचित्र व्हायरल झालं आहे, याचं फळ बाहुलीच्या डोळ्यासारखं दिसतं. यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसनुसार, पक्षी या वनस्पतीची फळं खातात, परंतु ही वनस्पती मानवांसाठी विषारी आहे. एका युजरने फोटोवर कमेंट केली आहे की, 'त्याचं खोड कोंबडीच्या पंजासारखे आहे.'

बाहुलीच्या डोळ्यांसारख्या दिसणार्‍या या वनस्पतीचे नाव Actaea pachypoda आहे, ज्याला बाहुलीचे डोळे असंही म्हणतात. यूएस नॅशनल पार्क सर्व्हिसने इंस्टाग्रामवर या अत्यंत असामान्य वनस्पतीचा फोटो शेअर केला आहे. त्या वनस्पतीबद्दल अधिक माहिती देणारे कॅप्शनही त्यांनी शेअर केलं आहे.

हे विचित्र फळ पक्ष्यांसाठी विषारी नाही तर माणसांसाठी विषारी आहे. Actaea pachypoda, पांढरे बॅनबेरी किंवा बाहुलीचे डोळे, Ranunculaceae कुटुंबातील Actaea वंशातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. या वनस्पतीचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे फळ. याचा व्यास 1 सेमी आहे. त्याचा आकार पांढऱ्या बेरीसारखा असतो. त्याच्या पोत आणि रंगामुळे त्याला 'डॉल्स आय' फळ म्हटलं जातं.

बाहुलीच्या डोळ्यासारख्या दिसणाऱ्या या अजब वनस्पतीला पहिल्या काही तासांतच 47 हजार लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय या प्लांटची शेअर केलेली पोस्ट पाहून लोकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.बाहुल्याच्या डोळ्यासारख्या दिसणार्‍या या फळांच्या रोपाबद्दल इंस्टाग्राम युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणीतरी 'तो माझ्याकडे बघतोय का?' अशीही कमेंट केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : ‘थ्रीडी शो’ अन् ‘शिवसृष्टी’ तोट्यात, उत्पन्न ८ लाख तर खर्च ९ लाख; नावीन्यपूर्ण उपक्रम ठरताहेत ‘पांढरा हत्ती’

Corruption Case : पूजा खेडकरच्या वडिलांच्या घरावर छापा, कोट्यवधींची बेहिशोबी मालमता; उत्पन्नाच्या १०३ टक्के जास्त माया जमवली कशी?

'एकाने रक्ताने पत्र लिहून भेटायला आला अन्...' रेणूका शहाणे यांनी सांगितला चाहत्याचा किस्सा, म्हणाल्या...‘हम आपके हैं कौन सिनेमानंतर.’

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा, प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update : सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती; NIAची मुंबई उच्च न्यायालयात धाव

SCROLL FOR NEXT