Video Viral Sakal
Trending News

Sidhi Pee Case Video Viral : लघुशंका प्रकरणी तक्रार द्यायला गेलेले काँग्रेस नेते आपापसांत भिडले; चप्पल, लाथाबुक्क्याने मारहाण

काँग्रेसच्या महिला नेत्याने दुसऱ्या एका काँग्रेस नेत्याला चप्पलेने मारहाण केली.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका भाजप पदाधिकाऱ्याने दलित वर्गातील एका तरूणाच्या अंगावर लघुशंका केल्यामुळे मोठा वाद झाला होता. त्यानंतर काँग्रेसचे काही नेते पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी निवेदन द्यायला गेले असताना त्यांच्यात वाद झाले असून त्यांनीच एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहितीनुसार, लघुशंका प्रकरणी काँग्रेसचे नेते डीसीएम कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि बाहेर येतांना या नेत्यांनी एकमेकांवर चप्पलेने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिधी जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष केसरसिंह डावर यांना त्यांच्याच पक्षाच्या महिला नेत्याकडून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला नेत्याने पळत येऊन डावर यांचा गळा पकडला आणि तुला इथे कुणी बोलावलं असं विचारलं. त्यानंतर त्यांनी मी पार्टीचा कार्यकर्ता असल्यामुळे इथे आलो आहे असं सांगितलं. पण यावरून पुढे वाद वाढला आणि तिने डावर यांना मारहाण केली. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीसुद्धा डावर यांना मारहाण केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर महिला नेत्याने डावर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. डावर यांच्याविरोधात महिला नेत्याने मारहाण आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे तर डावर यांनीसुद्धा महिला नेत्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणाची दखल घेण्यात आली असून अधिकचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

SCROLL FOR NEXT