Viral Wedding Video Esakal
Trending News

Viral Wedding Video : मांडवात पोहोचला नवरीचा बॉयफ्रेंड; त्यानंतर जे झालं नवरा पाहतच राहिला

या व्यक्तीचा संताप आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरुन आणि बोलण्यातून दिसून येतोय.

Sudesh

भारतातील लग्न म्हटलं की त्यात काही ना काही सीन होतातच. बऱ्याच वेळा लग्नातील भांडणांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बरं ही भांडणं नातेवाईकांमधील असेल तर तरी ठीक. पण जर नवरीचा जुना प्रियकरच मांडवात पोहोचला आणि राडा घालू लागला तर?

अशाच एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय, की एक व्यक्ती एका लग्नात पोहोचून नवरीला आपल्यासोबत येण्याची विनवणी करत आहे. या व्यक्तीचा संताप आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरुन आणि बोलण्यातून दिसून येतोय.

"तू समाजाची पर्वा करू नको काजल, मी तुझ्यावर खरं प्रेम करतो. तूही माझ्यावर प्रेम करतेस ना?" असं ही व्यक्ती मंडपात फेऱ्यांच्या तयारीत असलेल्या नवरीला म्हणत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय.

नवरीचा ओळखण्यासही नकार

एकीकडे ही व्यक्ती स्वतःला नवरीचा प्रियकर म्हणवत असताना, नवरीने मात्र या व्यक्तीला ओळखण्यासही नकार दिला. "प्रेम करणं सोडच, मी तर तुला ओळखतही नाही. तू इथून निघून जा." असं ही नवरी या व्यक्तीला म्हणते.

या सगळ्यात नवरदेव मात्र या दोघांची भांडणं पाहतच राहतो. या दोघांच्या मध्ये बोलावं की नाही या विवंचनेत हा नवरदेव असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसून येतंय.

स्क्रिप्टेड व्हिडिओ

दरम्यान, हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. वेडिंगवर्ल्ड पेज या इन्स्टाग्राम हँडलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ फेक असला, तरी वास्तविक जीवनातही मुलं आणि मुली असं करू शकतात, अशा आशयाच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिसून येत आहेत. यामध्ये कोण बरोबर आणि कोण चूक याबद्दलही कित्येक नेटकरी वाद घालताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT