Emotional Story: Woman Reunites with Man After Discovering Coma Truth esakal
Trending News

Viral Lovestory Video : तिला वाटलं त्याने फसवलं, पण तो देत होता मृत्यूशी झुंज ; अश्रू अनावर करणारी ही अविश्वसनीय जोडी होतीये व्हायरल,व्हिडीओ पाहिलात का?

Cody and Haley Video : हेली कोडीची अविश्वसनीय प्रेमकथा सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Saisimran Ghashi

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याची अविश्वसनीय प्रेमकथा चांगलीच चर्चेत आहे. ही कथा खरी वाटत नाही पण ती सत्य आहे हेच या प्रेमाचे वैशिष्ट्य. हवाईमध्ये (Hawai) भेट झालेली हॅली आणि कोडी (Cody and Haley) यांच्या प्रेमाची ही कहाणी कोणाच्याही डोळ्यात अश्रू आणेल.

कोडी आणि हॅली हवाईमध्ये भेटले आणि लवकरच ते जवळ आले. पण काही दिवसांनी कोडी अचानक संपर्काबाहेर गेला. हॅलीने त्याला मेसेज केले पण उत्तर मिळाले नाही. तिने त्यातून समजले की कोडीने तिला 'गोस्ट' (Ghosting) केलं आहे.

पण, सत्य मात्र खूप वेगळं होतं. काही दिवसांनी तिला एका GoFundMe पेजबद्दल माहिती झाली.GoFundMe पेजबद्दल माहिती होती कोडीची. तो अपघातात गंभीर जखमी झाला होता आणि कोमात गेला होता. त्याच्या उपचारासाठी त्या पेजवर मदत मागितली होती.

ही माहिती हॅलीसाठी धक्कादायक होती. पण तिने हिम्मत न हारता कोडीशी पुन्हा संपर्क जोडून घेण्याचा निर्णय घेतला. कोमातून बाहेर आल्यानंतर कोडीला हॅलीची कोणतीही आठवण नव्हती. मात्र हॅलीने त्याची काळजी घेतली आणि त्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत राहिली.

आज हे दोघे एक वर्षापासून पुन्हा एकत्र आहेत. त्यांच्या प्रेम कथेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. लोकांनी या व्हिडीओला भरपूर प्रेम दिले आहे. यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. काहींनी हॅलीच्या निष्ठेचे कौतुक केले तर काहींनी त्यांच्या या प्रेमाची कथा अतिशय सुंदर असल्याचे म्हटले आहे.

ही स्टोरी थोडीशी फिल्मी वाटत असली तरी हे सत्यात घडलं आहे.या अविश्वसनीय प्रेमकथेने तुमच्या चेहऱ्यावर नक्की एक स्माईल आणि डोळ्यात पाणी आणलं असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT