Viral News Sakal
Trending News

Viral News : "देव तारी त्याला कोण मारी" बोट बुडूनही 6 तास फ्रिजमध्ये बसून वाचवला जीव

आपला जीव वाचवण्यासाठी कोणीतरी मदतीला येईल या आशेने ही व्यक्ती 6 तास पोहत राहिली.

सकाळ डिजिटल टीम

Viral News : "देव तारी त्याला कोण मारी" ही म्हण आपल्यापैकी अनेकांनी ऐकली आहे. या म्हणीचा प्रत्यय एका व्यक्तीबाबत समोर आला आहे. बोट उलटल्यानंतर एक व्यक्ती फ्रिजच्या सहाय्याने तब्बल सहा तास जीव वाचवण्यासाठी झटत होती. सध्या ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणारी ही घटना दक्षिण थायलंडमधील क्राबी प्रांताच्या किनार्‍यावरील आहे.

मुआंग जिल्ह्यातील नोंग थेले उपजिल्ह्यातील थ्री गावामधील 33 वर्षीय मच्छिमार अनात मासोयट (Anat Massoyot) हे त्यांच्याकडील बोटीमधून हॉंग आयलँडजवळील कोह लाओ हँग बेटावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र, २३ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे मासेमारीसाठी गेले होते.

त्यावेळी अचानक त्यांची बोट पाण्यात उलटली. त्यावेळी जीव वाचवण्यासाठी अनात यांनी मासे ठेवण्यासाठी बोटीवरील फ्रिजची मदत घेतली. मासे ठेवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रिजच एक दिवस आपला जीव वाचवेल असा विचार अनात यांनी स्वप्नातही केला नव्हता. बोट उलटल्यानंतर आपल्याला वाचवण्यासाठी कुणीतरी येईल यासाठी ते फ्रिजवर बसून तब्बल सहा तास वाट बघत राहिले.

सहा तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर एक मासेमारी करणाऱ्या बोटीवरील काही नागरिकांनी ही घटना बघितली. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता नागरिकांनी धाव घेत अनात यांना मदत करत त्यांना फ्रीजमधून सुखरूप बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

उल्हासनगरच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत! महायुतीतील धुसफूस पुन्हा उघड; भाजप नगरसेवकाची कमलेश निकम यांच्यावर टीका

'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT