Down Syndrome couple marriage in India Sakal
Trending News

Viral News: एका ‘खास’ लग्नाची गोष्ट; फोटो पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल

डाऊन सिंड्रोम ग्रस्त जोडप्याच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वैष्णवी कारंजकर

लग्न करण्याचा निर्णय हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. एका जोडप्याच्या अशाच एका महत्त्वाच्या आणि सर्वात आनंदाच्या क्षणाचे सर्वांनाच भावूक करणारे फोटो समोर आले आहेत. डाऊन सिंड्रोम ग्रस्त जोडप्याच्या या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 पावसाळ्याच्या या नव्या पालवीच्या ऋतुमध्ये दोघांनी पुण्यात आपल्या नव्या आयुष्याचीही सुरुवात केली आहे. या दोघांनाही डाऊन सिंड्रोम आहेत. नव्या नवरीने गुलाबी रंगाची सुंदर सिल्कची साडी परिधान केली आहे. तर नवरदेवाने सोनेरी काठाचं पांढऱ्या रंगाचं धोतर परिधान केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या जोडप्याने तमिळ आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं आहे. २२ वर्षीय अनन्या सावंत ही पुण्याची असून नवरदेव २७ वर्षीय विघ्नेश कृष्णस्वामी दुबईमध्ये काम करतो. मोठ्या थाटामाटात या दोघांचंही लग्न झालं. यावेळी या दोघांचेही नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तमिळ आणि मराठी दोन्ही संस्कृतींच्या प्रथांप्रमाणे हे लग्न पार पडलं.

डाऊन सिंड्रोम म्हणजे काय?

डाउन सिंड्रोमला ट्रायसोमी 21 असेही म्हणतात. डाऊन सिंड्रोम ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मनुष्य मानसिक आणि शारीरिक विकारांनी ग्रस्त असतो. यामुळं शारीरिक विकास होण्याची अधिक कालावधी लागतो. चेहऱ्यामध्येही विशेष बदल घडतात आणि बौद्धिक विकासही तुलनेनं कमी आणि कमी वेगाने होतो.

 या जोडप्याचा हा फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कौतुक होत आहे. हा फोटो पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच अनेक लोक लग्नाची शुभेच्छाही देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT