Viral News  esakal
Trending News

Viral News : या माणसाचा जगण्याचा फंडाच वेगळा! तब्बल 17 वर्षांपासून फक्त कोल्ड ड्रिंक्सवर जीवंत

र्वसामान्यांचा समज घोलमरेझा अर्देशीरी या इराणी व्यक्तीने खोटा ठरवला आहे

सकाळ डिजिटल टीम

Viral News : उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुषी जीवनासाठी योग्य आहार आणि व्यायामाची जोड असावी लागते असा जवळपास तुम्हा आम्हा सगळ्यांचाच समज आहे. तज्ज्ञ देखील उत्तम आरोग्यासाठी व्यवस्थित आहार आणि व्यायाम करण्याचा सल्ला देतात.

मात्र सर्वसामान्यांचा समज घोलमरेझा अर्देशीरी या इराणी व्यक्तीने खोटा ठरवला आहे. त्याने असा दावा केलाय की तो मागल्या 17 वर्षांपासून फक्त कोल्ड ड्रिंक्सवर जगतोय. त्याने 17 वर्षापूर्वी शेवटचे जेवण केले होते. तेव्हापासून त्याने अन्नाचा दाणाही खाल्लेला नाही.

फक्त कोल्डड्रिंक्सवर जीवंत

या व्यक्तीचा असा दावा आहे की मागल्या 17 वर्षापासून तो अजिबात जेवलेला नाही. तो फक्त कोल्ड ड्रिंक्स पितोय. त्याने जेवणात सॉलीड पदार्थ खाणे 17 वर्षांपूर्वीच सोडून दिले होते. अर्देशिरी हा मध्यमवर्गीय श्रेणीतील व्यक्ती फायबरग्लास दुरुस्त करून त्याचा उदरनिर्वाह करतो. त्याने त्याच्या जगण्याचे श्रेय एका स्नॅपशॉट्समध्ये पेप्सीसारख्या कार्बोनेटेड शीतपेयांना दिले आहे. (Lifestyle)

2006 मध्ये बंद केले जेवण

तुम्हाला या व्यक्तीबाबत वाचून असेही वाटत असेल की मागल्या 17 वर्षात केवळ शितपेयांव्यतिरिक्त काहीही न घेता त्याला कधी भूक लागली नाही काय? तर त्याने याबाबत असा दावा केलाय की मी फक्त या काळात कोल्ड ड्रिंक्सवर जगलो. आणि या काळात मी उपाशी आहे किंवा मला भूक लागलीय असे मला अजिबात जाणवले नाही. (viral)

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इराणी व्यक्तीने स्थानिक माध्यमांसमोर खुलासा केला की त्याने जून 2006 मध्ये अन्न घेणे बंद केले, त्याच्या याअसाधारण आहाराच्या प्रवासाची सुरुवात सुमारे दोन दशकांपूर्वी झाली होती. आणि दोन दशकांनंतरही तो फक्त कोल्ड ड्रिंकवर जीवंत आहे. (Drink)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT