Viral News sakal
Trending News

Viral News : अबब! एका व्यक्तीने वर्षभरात चक्क सहा लाखांची इडली खाल्ली

या इडली लव्हरने चक्क वर्षभरात सहा लाखांची इडली खाल्ली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral News : इडली हा पदार्थ साऊथ इंडीअन असला तरी देशभरात प्रचंड प्रसिद्ध आहे. देशभरात अनेक इडली लव्हर्स असतील ज्यांना दररोज इडली खायला आवडतं पण सध्या एका आगळ्या वेगळ्या इडली लव्हरची चांगलीच चर्चा सुरू आहे.

या इडली लव्हरने चक्क वर्षभरात सहा लाखांची इडली खाल्ली आहे. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे पण हे खरंय. स्वीगीने यासंदर्भात गुरुवारी माहिती दिली.

स्वीगीने दिलेल्या माहितीनुसार एका हैद्राबादच्या व्यक्तीने  गेल्या 12 महिन्यांत या स्वीगी अॅपवरुन सहा लाख रुपयांची इडली ऑर्डर केली होती. विशेष म्हणजे हा आकडा मोठा असून फक्त या अॅपवरुन सहा लाखांची इडली ऑर्डर केली आणि याशिवाय अन्य ठिकाणी त्याने जर इडली खाल्ली असेल तर कदाचित सहा लाखांचा आकडा आणखी जास्त वाढू शकतो.

दरवर्षी जागतिक इडली दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून स्वीगीने वर्षभराचा अहवाल सादर केलाय. त्यात ही माहिती दिली. या व्यक्तीने सहा लाख रुपयात तब्बल 8,428 प्लेट इडली मागवल्या होत्या.

इडली हे अत्यंत लोकप्रिय फुड आहे. स्वीगीने दिलेल्या अहवालात असेही म्हटले आहे की गेल्या वर्षभरात बँगलोर, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये सर्वाधिक इडल्या मागवल्या. इडलीला हेल्दी फुड म्हणूनही पसंती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT