Viral Video Sakal
Trending News

Mumbai News : वांद्रे रेल्वे स्थानकावर तैनात महिला पोलिसांचीच काढली छेड; व्हिडीओ व्हायरल

हे तरुण चालत्या लोकलमध्ये दरवाज्यात उभं राहून रील करत होते आणि प्रवाशांना त्रासही देत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला पोलिसांची काही तरुणांनी छेड काढली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकात रील करणाऱ्या तरुणांकडून लोकलच्या दरवाजात उभे राहून स्थानकावर कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर करून छेडतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

यासंबंधीची एक तक्रार वांद्रे लोहमार्ग पोलिसांना करण्यात आली आहे. या आधारे त्या रील बनवणाऱ्या आणि महिलांना छेडणाऱ्या आरोपीचा वांद्रे लोहमार्ग पोलीस शोध घेत आहेत.

दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकातून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकलच्या दरवाज्यात उभे राहून एका उनाड तरुणाने रील बनवला. या रीलमध्ये तो स्वतःला मस्तान कंपनीचा म्होरक्या समजून त्या कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तन करत होता.

एका नागरिकाने हा व्हिडीओ मुंबई पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांना ट्विटवर टॅग केला आहे यानंतर आता वांद्रे लोहमार्ग पोलीस या मस्तान कंपनीच्या मोहरक्याला अटक करण्याच्या तयारीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT