Viral Video Delhi young couple hug motor riding social  esakal
Trending News

Viral Video : 'भीती राहिली कुठं'? दिल्लीच्या जोडप्याने हद्दच केली राव!

आता दिल्लीतील त्या प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

युगंधर ताजणे

Viral Video Delhi young couple hug motor rideing : सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ हे जसे अनेकदा मनोरंजन करतात तसे ते सध्या समाजात कोणत्या प्रकारच्या कृत्यांना खतपाणी घातले जाते हेही दिसून येते. दिल्लीतील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. काय आहे हे प्रकरण आपण जाणून घेणार आहोत.

यापूर्वी देखील महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये एक प्रेमी युगूल दुचाकीवर रोमान्स करताना दिसून आले होते. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या घटनेची संभाजीनगर पोलिसांनी दखल घेतली होती. आणि त्या जोडप्याला चांगलीच अद्दल घडवली होती. आता दिल्लीतील त्या प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सार्वजनिक ठिकाणी कोणती काळजी घ्यायला हवी, आपण कसे वागले पाहिजे याचे भान बऱ्याचदा तरुणाईला राहत नाही हे अनेकदा दिसून आले आहे. सुट्टीच्या दिवशी भटकंतीसाठी बाहेर जाणे आणि सेल्फीच्या अट्टाहासापायी जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करणे तरुणाईच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले आहे. दिल्लीतील त्या व्हिडिओनं पुन्हा एकदा तरुणाईला कुणाची भीतीच राहिली नाही की काय, असा प्रश्न समोर आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचे प्रदर्शन करत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा त्या तरुण-तरुणीचा प्रयत्न चर्चेत आला आहे. त्यावर अनेकांनी गंभीर शब्दांत त्यांना समज दिली आहे. दिल्लीतील रस्त्यावक यापूर्वी अशा घटना कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी त्या घटनेची नोंद घेत त्या जोडप्याला समज दिली आहे. संबंधित ट्विटर युझर्सनं तो व्हिडिओ शेयर करताना म्हटलं आहे की, मंगोलपुरीच्या जवळपास असणाऱ्या रिंग रोडच्या फ्लायओव्हरवर हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

त्या व्हिडिओमध्ये ती तरुणी दुचाकीच्या पेट्रोल टँकवर बसली असून तो तरुण दुचाकी चालवत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, इडियट्स ऑफ दिल्ली, वेळ - संध्याकाळ सव्वा सातची...दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी त्या व्हिडिओची तातडीनं दखल घेतली आहे. त्या तरुणानं वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT