Viral Video Gas Explosion in house esakal
Trending News

Viral Video : सिलेंडरमधून गॅस गळती; ब्लास्ट झाला अन् दोघांनी...,भयंकर व्हिडिओ व्हायरल, अशी घ्या घरच्या सिलेंडरची काळजी

Viral Video Gas Explosion in house : गॅस गळतीमुळे घरात भीषण स्फोट झाला असून, दोघांनी प्रसंगावधान राखून जीव वाचवला. स्फोटामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Saisimran Ghashi

Gas Blast Viral Video : पुण्यात एका रहिवासी घरात गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे जबरदस्त स्फोट झाला असून, यामध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने, प्रसंगावधान राखल्यामुळे घरातील दोन व्यक्तींनी वेळेत पळ काढत आपला जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की किचनमध्ये सिलेंडरमधून गॅस गळती होत होती. घरातील एका व्यक्तीने ही गोष्ट लक्षात घेऊन तातडीने सिलेंडर किचनमधून उचलून हॉलमध्ये नेऊन ठेवला. यानंतर त्याने दुसऱ्या व्यक्तीसह घराबाहेर धाव घेतली.

गॅसची गळती थांबली असावी असे वाटल्याने काही वेळाने दोघेही पुन्हा घरात परत आले. मात्र ते सिलेंडरजवळ पोहोचताच अचानक भीषण स्फोट झाला. आवाज एवढा जोरात होता की आजूबाजूच्या घरांनाही हादरा बसला.

स्फोटामुळे घरातील फर्निचर, भिंती, छत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घराचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा प्रसंग अत्यंत धक्कादायक होता.

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. त्यांनी उर्वरित भागाची पाहणी करून सुरक्षिततेसाठी काही सूचना दिल्या.

सुरक्षेसाठी काय करावे?

अशा प्रकारच्या दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी पुढील गोष्टींचं पालन करणं अत्यावश्यक आहे

  • गॅस गळतीची शंका आल्यास तात्काळ घरातील विजेचे स्वीच बंद करावेत.

  • सिलेंडर हलवण्याआधी दरवाजे-खिडक्या उघडून हवामान मोकळं करावं.

  • शक्य असल्यास अग्निशमन दल, पोलीस किंवा गॅस कंपनीशी तात्काळ संपर्क साधावा.

नागरिकांनी प्रसंगावधान राखून आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता बाळगणं गरजेचं आहे. अशा घटना केवळ एका क्षणात जीवघेण्या ठरू शकतात, त्यामुळे प्रत्येकाने सजग राहणं अत्यंत आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT