Viral Video  esakal
Trending News

Viral Video : हॉस्पिटल स्टाफने पडदा ओढून रूग्णासोबत केलं असं कृत्य, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले

लोकांनी तुमच्या पेशंटला कधीच एकटे सोडू नका असे म्हटले आहे

सकाळ डिजिटल टीम

Viral Video :

हॉस्पिटलमध्ये पेशंट बरे होण्यासाठी जातात. पण, काही वेळा डॉक्टर आणि स्टाफकडून त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका हॉस्पिटलमधील स्टाफने रूग्णासोबत केलेलं कृत्य पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

या व्हिडिओत हॉस्पिटलमधील एक रूग्ण बेडवर झोपलेला दिसत आहे. तर स्टाफ मेबर त्या व्यक्तीजवळ येतो. त्याच्या बाजूचा पडदा ओढतो आणि त्याच्या पोटात हाताच्या कोपऱ्याने जोरात मारतो, या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.  

मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर व्हिडिओ शेअर करून प्रोफेसर सुधांशू त्रिवेदी नावाच्या युजरने, व्हिडिओत दिसणारा व्यक्ती डॉक्टर असल्याचा दावा केला आहे.

त्यांनी लिहिले आहे की, 'लोकांनी डॉक्टरला देवाचा दर्जा दिला आहे, पण इथे डॉक्टर सैतानाच्या रूपात आहे. हा आरोपी डॉक्टर नसून वॉर्ड बॉय किंवा इतर कर्मचारी असल्याचे लोक मानतात. पण या 20 सेकंदाच्या क्लिपने सर्वांनाच धक्का दिला आहे.

लोकांनी तुमच्या पेशंटला कधीच एकटे सोडू नका असे म्हटले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रूग्णालयातील कर्मचारी आधी रूग्णाच्या बेडजवळचा पडदा हटवताना आणि नंतर तो बंद करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुग्ण असहाय्यपणे वार सहन करत आहे. सुदैवाने कर्मचाऱ्यांची ही कृती तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, अन्यथा या घटनेवर कोणाचाही विश्वास बसला नसता. मात्र, त्या व्यक्तीची नजर कॅमेऱ्यावर पडताच तो घटनास्थळावरून पळून जातो.

सीसीटीव्ही फुटेजनुसार ही घटना बुधवारी १९ जून रोजी घडली. मात्र, या घटनेचे नेमके ठिकाण अज्ञात असून रुग्णाला क्रूरपणे वागणूक देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. रुग्णासोबत कर्मचाऱ्यांच्या अमानवी कृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आरोपी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका यूजरने केली आहे, असे लोक डॉक्टर नव्हे तर शैतान म्हणण्यास पात्र आहेत. तर, हा डॉक्टर नसून नर्सिंग स्टाफ आहे. पण त्याने जे काही केले ते सहन होण्याच्या पलिकडचे आहे, असे नेटकरी म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ते पण आपल्यातलेच! मुंबईतील 'कबुतरां'च्या वादात PETA ची उडी; Video तून करतायेत जनजागृती

Latest Marathi News Live Update: कृषी समृद्धी योजने'साठी नवीन ' लेखाशिर्ष' मंजूर

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

Nashik: रिक्षा चालकांनी मदत नाकारली, आईच्या खांद्यावर लेकराने जीव सोडला; भाजपचा पदाधिकारी धावला, पण..

SCROLL FOR NEXT