Viral Video Japanese Ambassador Hiroshi Suzuki youtuber Mayo San Amazing Dance on Kaavvalaa of Rajinikanth Jailer Movie 
Trending News

Viral Video: जपानी अ‍ॅम्बेसिडरची थलैवा स्टाईल! रजनीकांतच्या 'कव्वाला'वर भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल

सुझुकी हे सोशल मीडियावर भारतातील आवडत्या गोष्टींचे भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतात.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : रजनीकांतचा जेलर हा सिनेमा सध्या लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. त्यातच आता जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझूकी यांचा एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत सुझूकी यांनी रजनीकांतच्या जेलर सिनेमातील 'कव्वाल्ला' या गाण्यावर डान्स केला आहे. एका जपानी युट्यूबरसोबत त्यांनी हा व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. (Viral Video Japanese Ambassador Hiroshi Suzuki youtuber Mayo San Amazing Dance on Kaavvalaa of Rajinikanth Jailer Movie)

रजनीकांतच्या 'जेलर'ची हवा

जेलर सिनेमात सुपरस्टार रजनिकांत आणि तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दण्यात कमाई केली आहे त्यामुळं तो सुपरहीट झाला आहे. जगभरातील सिनेप्रेमींच्या पंसतीस हा सिनेमा उतरला आहे. या सिनेमातील कव्वाला या गाण्यात तर धुमाकूळ घातला आहे, या गाण्यातील स्टेप्सनं तर डान्सप्रेमींना रिल्स आणि व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहित केलं आहे. (Latest Marathi News)

सुझुकींचा व्हिडिओ व्हायरल

याच 'कव्वाला' गाण्याची आणि त्यांच्या डान्सस्टेप्सची भुरळ जपानचे भारतातील अॅम्बेसिडर हिरोशी सुझुकी यांनाही पडली आणि त्यांनी प्रसिद्ध युट्यूबर मायो सॅन हीच्यासोबत या कव्वाला गाण्यावर डान्स परफॉर्म केला आहे. या डान्समधून त्यांनी सुपरस्टार रजनीकांतबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. (Marathi Tajya Batmya)

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला असून त्याला लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, कव्वाला डान्स व्हिडिओ विथ जॅपनिज युट्यूबर मायो सॅन (@MayoLoveIndia) माय लव्ह फॉर रजनिकांत कन्टिन्यू... १७ सेकंदाचा हा व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये सुझुकी आपले गॉगल रजनीकांतप्रमाणं प्लिप करताना दिसत आहेत. डान्स चुकू नये म्हणून ते दुसऱ्या एका व्यक्तीची मदत घेताना दिसत आहेत. या व्हिडिओवर त्यांनी वन्नक्कम असंही म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT