Parliament winter Session 2023 visitor jumped into LS chamber from gallery was seen leaping over benches  
Trending News

Viral Video: मला दे मला दे! संसदेबाहेरुन चॅनेलवर स्मोक क्रॅकर दाखवण्यासाठी पत्रकारांची चढाओढ

संसदेत घुसखोरांनी उडवलेल्या स्मोक क्रॅकरमुळं खळबळ उडाली आहे, पण याचं रिपोर्टिंग करणाऱ्या टीव्ही पत्रकारांमध्ये यावरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : संसदेत घुसखोरांनी उडवलेल्या स्मोक क्रॅकरमुळं खळबळ उडाली आहे, पण याचं रिपोर्टिंग करणाऱ्या टीव्ही पत्रकारांमध्ये यावरुन झालेल्या वादाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं एकीककडं संसदेत झालेल्या घुसखोरीमुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना दुसरीकडं पत्रकारांमधील वाद यामुळं वेगळीच चर्चा रंगली होती.

नेमकं काय घडलंय?

संसदेत दोन घुसखोर तरुणांनी पिवळ्या रंगाचे स्मोक क्रॅकर उडवले तसेच संसदेबाहेर असलेल्या त्यांच्या दोन साथिदारांनी असेच स्मोक क्रॅकर उडवले. पण संसदेबाहेर उडवलेल्या या स्मोम क्रॅकरची रिकामी पुंगळी हातात घेऊन टीव्ही पत्रकार या घटनेचं रिपोर्टिंग करत होते.

पण आपल्या चॅनेलवरही ही पुंगळी दिसली पाहिजे त्यासाठी लाईव्ह चित्रिकरण सुरु असतानाच दुसऱ्या चॅनेलचा एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराच्या हातून ती घेण्यासाठी झडपडत असल्याचं दिसतं आहे. यातून दोन्ही पत्रकारांमध्ये काहीकाळ वाद झाला.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळं या गंभीर विषयाचं पत्रकारांना गांभीर्य नसल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

लाजीरवाणं प्रदर्शन

पण या व्हिडिओनुसार, शेवटी जेव्हा हा पत्रकार आपल्या हातातील पुंगळी कॅमेरॅसमोर दाखवत असताना दुसरा एक पत्रकार त्याच्या मागून येऊन त्याच्या हातातील ती पुंगळी ओढून आपल्या ताब्यात घेतो आणि स्वतः आपल्या चॅनेलवर दाखवण्यासाठी ती घेऊन जातो. यानंतर तिथं उपस्थित असलेले इतर पत्रकार या घटनेवर मोठ्यानं हसताना दिसत आहेत. (Latest Marathi News)

उलट सुलट कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी उलटसुलट कमेंट्स केल्या आहेत. यामध्ये एकानं म्हटलं की, संसद भवनात सुरक्षेत गंभीर चूक झालेली असताना न्यूज चॅनेलवर एक्सक्लुजिव्ह न्यूज दाखवण्यासाठी पत्रकारांवर असलेल्या दबावाचा केविलवाणा प्रकार. दुसऱ्या युजरनं म्हटलं की, या पत्रकारांना आता ऑस्कर द्यावा की भारतरत्न? आणखी एक युजरनं या व्हिडिओवर म्हटलंय की, एखाद्या बर्थडे पार्टीत लहान मुलं केक वाटण्यासाठी भांडतात.

संसदेत काय घडलं?

संसदेत लोकसभेत चर्चा सुरु असताना बुधवारी, १३ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. यामध्ये दोन तरुण गॅलरीत लटकून खाली उतरले आणि त्यांनी स्मोक क्रॅकर्स उडवले. अचानक घडलेल्या याप्रकारामुळं संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT