Viral Video  Sakal
Trending News

Viral Video : दिवाळीतील स्वच्छतेचे भूत! पुसण्याऐवजी पाण्याने धुतल्या 'या' वस्तू

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : दिवाळी येण्यास अवघे काही दिवस उरले असून अनेक घरांमध्ये स्वच्छता मोहीम जोरात राबवली जात आहे. एकीकडे शॉपिंग आणि दुसरीकडे स्वच्छता ही दोन्ही कामं आवश्यक आहेत. असाच एक स्वच्छतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या अंगात स्वच्छतेचे इकते भूत गेले आहे की, घरातील वस्तू कापडाने पुसण्याऐवजी याने चक्क पाण्यान धुवून काढल्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वच्छता करण्यात इतकी एकाग्र झाली आहे की, स्वच्छता करताना ही व्यक्ती घरातील नको त्या वस्तू पाण्यानी धूतांना दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून तुम्हाला 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील ते दृश्य आठवेल. ज्यात साधी गोपी सून पाण्याने लॅपटॉप धुताना दिसते. या सीनबद्दल इंटरनेटवर बरेच मीम्स बनवले गेले होते, जे आजही व्हायरल होत आहेत.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्येही एक व्यक्ती काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कापडाने पुसण्याऐवजी त्या पाण्याने धुताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही व्यक्ती संगणक आणि टीव्ही पाण्याने धुतांना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 75.9K व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT