Viral Video
Viral Video esakal
Trending News

Viral Video: सिलेंडरचे रॉकेट थेट आकाशात!काय आहे प्रकरण? बघा व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

Gas Cylinder Rocket: मनमाड कडून मालेगावकडे गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक कानडगाव जवळील पाणपोई फाट्यावर पलटी झाला आहे. हा ट्रक पलटी झाल्याने त्यातील काही सिलेंडरचा स्फोट झाला. अपघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीत ट्रक पुर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघातात कुठलीही जीवहानी झालेली नाही. ट्रकमधून काही सिलेंडर आकाशात रॉकेट उडावे त्याप्रमाणे कितीतरी मीटर उंचावर उडालेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या अपघातामुळे मनमाड मालेगाव महामार्गावर दोन्ही बाजूंनी दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. चांदवड पोलिस घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये सिलेंडर एखाद्या रॉकेटप्रमाणे थेट आकाशात उडताना दिसताय. हा विचित्र व्हिडिओ बघून नेटकरीही थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT