School bus brake fail accident viral CCTV video esakal
Trending News

Video : ब्रेक फेल अन् भीषण थरार! स्कूल बसने 8 गाड्यांना चिरडले, अपघाताचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल..

School bus brake fail accident viral CCTV video : शाळेच्या बसचा ब्रेक फेल होऊन सिग्नलवर थांबलेल्या ८ गाड्यांवर आदळल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातामुळे दुचाकींचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत.

Saisimran Ghashi
  • शाळेच्या बसचे ब्रेक फेल होऊन ८ गाड्यांवर जोरदार धडक झाली.

  • सीसीटीव्हीत संपूर्ण अपघाताचे थरारक दृश्य कैद झाले आहे.

  • सोशल मीडियावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक हृदयद्रावक आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका स्कूल बसचा इतका भीषण अपघात दाखवण्यात आला आहे की, पाहणाऱ्याचं काळीज क्षणभर थरकापून जातं. ब्रेक फेल झाल्याने स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल ८ गाड्यांना चिरडले. या अपघातामुळे वाहनांची अक्षरशः चाळण झाली असून, काही दुचाक्यांचे तर फक्त अवशेष उरले आहेत.

अपघाताची थरारक दृश्यं सीसीटीव्हीत कैद

या भीषण अपघाताचा व्हिडीओ एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, रस्त्यावर सिग्नल लागल्याने अनेक गाड्या थांबलेल्या असताना मागून भरधाव वेगाने येणारी एक स्कूल बस थेट या गाड्यांवर धडकते. एका झटक्यात एकामागोमाग एक गाड्या उडत जातात. या गाड्यांमध्ये चारचाकी व दुचाकींचा समावेश असून, विशेषतः दुचाकींना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचे दिसून येते. (School Bus Accident Video)

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा व्हिडीओ @primezewsmarathi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून, याला आतापर्यंत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “ब्रेक फेल झाले अन् स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल ८ गाड्यांना चिरडले, भयाण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद”. या पोस्टवर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने लिहिलं, “स्कूल बस आणि ब्रेक फेल म्हणजे मुलांच्या जिवाशी थेट खेळ! शाळांनी गाड्यांची स्थिती वेळोवेळी तपासली पाहिजे.” दुसऱ्याने तर थेट चालकाच्या अक्षम्य निष्काळजीपणावर बोट ठेवलं “गिअर कमी करून किंवा हँडब्रेक वापरून गाडी थांबवता आली असती. हा केवळ अपघात नाही, तर निष्काळजीपणा आहे.”

अपघातामागचं प्राथमिक कारण ब्रेक फेल असल्याचं समोर आलं आहे. यावरून पुन्हा एकदा शालेय वाहतुकीतील असुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वाहनांची देखभाल, वेळेवर सर्व्हिसिंग, चालकांचं प्रशिक्षण हे सर्व मुद्दे आता शाळांपुढे गंभीरपणे विचारात घेण्यासारखे आहेत.

सध्या या घटनेबाबतची नेमकी ठिकाणाची माहिती अद्याप समोर आलेली नाही, तसेच कोणतीही जीवितहानी झाली का हेही स्पष्ट झालेलं नाही. मात्र व्हिडीओ पाहता अपघात किती गंभीर होता याची कल्पना सहज करता येते.

FAQs

  1. हा अपघात कुठे घडला?
    घटनास्थळाची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

  2. या अपघाताचे कारण काय होते?
    प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात घडला.

  3. या अपघातात जीवितहानी झाली का?
    अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही.

  4. व्हिडीओ कुठे शेअर झाला आहे?
    व्हिडीओ @primezewsmarathi या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT