viral video wife surpise husband with his dream gift esakal
Trending News

Viral Video : जिंकलंस भावा! इच्छा मारून कुटुंबासाठी झिजलास; पण पत्नीनं पूर्ण केलं तुझं अपूर्ण स्वप्न, 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

viral video wife surpise husband with his dream gift : वर्षानुवर्षं कुटुंबासाठी झटणाऱ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करत बायकोनं दिलं खास सरप्राइज. भावनांनी भरलेला हा क्षण पाहून सोशल मीडियावर सर्वच भावूक झाले

Saisimran Ghashi

Husband-Wife Viral Video : पती-पत्नीचं नातं हे फक्त जबाबदाऱ्यांचं नसतं, तर त्या नात्यामध्ये एकमेकांच्या भावना समजून घेणं आणि त्याचं जपणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ हेच अगदी मनापासून दाखवून देतो.

घराचा आधारस्तंभ असलेल्या नवऱ्याने आयुष्यभर कुटुंबासाठी जीव तोडून मेहनत केली. स्वतःच्या इच्छा, स्वप्नं सगळं बाजूला ठेवून घर चालवण्यासाठी आयुष्य वेचलं. पण त्याचं एक लहानसं स्वप्न स्वतःची एक बाईक काळाच्या ओघात विसरूनच गेला होता. आणि हे विसरलेलं स्वप्न त्याच्या पत्नीने ओळखलं…आणि पूर्णही केलं!

व्हायरल व्हिडीओत दिसतं की, एका कुटुंबात अचानक दारात एक मुलगा बाईक घेऊन येतो. घरातलं लहान मूल आनंदाने उड्या मारतं. पण खरी गंमत त्यानंतर दिसते ही बाईक त्या घरातल्या बायकोने नवऱ्यासाठी खास सरप्राईज म्हणून आणलेली असते.

पती बाईककडे नजरेने एकटक पाहत राहतो. क्षणभर त्याला समजतच नाही की काय घडतंय. त्याच्या डोळ्यांत आश्चर्य आणि आनंद दोन्ही भरून आलेले असतात. हळूहळू त्याच्या डोळ्यात अश्रू तरळू लागतात. तो जवळच्या वस्तू बायकोच्या हातात देतो आणि तिला जवळ ओढून मिठी मारतो. या व्हिडीओमधून हेच लक्षात येतं की, प्रेम हे फक्त बोलण्यात नाही, तर कृतीतून व्यक्त होतं.

@bhagyashreekarnikpatil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी कमेंट करून आपली भावना व्यक्त केली आहे. "तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगत आहेत तू किती खुश आहेस", "मरमर मेला कुटुंबासाठी, पण कुटुंबाने तुझी आठवण ठेवली", "अशा बायकोसाठी देवाचे आभार मानावेसे वाटतात", अशा हृदयस्पर्शी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या व्हिडीओने एक गोष्ट अधोरेखित केली आहे प्रेम हे मोठ्या गोष्टीत नसतं, तर त्या छोट्या पण मनापासून केलेल्या कृतींमध्ये असतं.

ही गोष्ट केवळ एक सरप्राईज नव्हती, ती होती पतीच्या कष्टांचा सन्मान. एका बायकोने आपल्या नवऱ्याचं विसरलेलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं, आणि त्याच्या डोळ्यांतील आनंदाचे अश्रू पाहून सगळेच भावूक झाले. खरंच, अशी पत्नी असणं हेच आयुष्यातलं खऱ्या अर्थानं भाग्य म्हणावं लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना आली चक्कर, नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विश्रामगृहाकडे धाव

Maharashtra Transportation: आता मद्यवाहतुकीला बसणार ‘ई-लॉक’चे कवच, जीपीएस ट्रॅकिंगमुळे अवैध विक्रीवर अंकुश बसणार!

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT