Viral Video Delhi Metro Man badly clicking photos of girl esakal
Trending News

Video : दिल्ली मेट्रोत अश्लील प्रकार! लपून मुलींचे फोटो काढणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडलं अन् त्याचे कपडे...,घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video Delhi Metro Man badly clicking photos of girl : दिल्ली मेट्रोच्या मॅजेन्टा लाईनवर एका तरुणीचे फोटो काढणाऱ्या पुरुषाला तिनेच रंगेहाथ पकडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Saisimran Ghashi

दिल्ली मेट्रोसारख्या आधुनिक आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतूनही महिला सुरक्षित नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मॅजेन्टा लाईनवरील एका मेट्रो स्टेशनवर मुलीचे गुपचूप फोटो काढणाऱ्या एका मध्यमवयीन पुरुषाला संबंधित तरुणीनेच रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

घटना मॅजेन्टा लाईनवरील एका भूमिगत मेट्रो स्थानकावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ही घटना घडली. आरोपी व्यक्ती कृष्णा पार्ककडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये लिफ्टजवळ उभा होता. त्याच वेळी, त्याने जवळ उभ्या असलेल्या एका तरुणीचे फोटो मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र सतर्क असलेल्या मुलीने हे लक्षात घेतले आणि त्याला तात्काळ अडवले.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, संबंधित पुरुष आपली चूक मान्य करत मुलीसमोर कान धरून माफी मागतो आहे. तर दुसरीकडे, ती तरुणी त्याला जाब विचारत आहे आणि इतर प्रवासी देखील त्या ठिकाणी थांबून ही संपूर्ण घटना पाहत आहेत.

महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

दिल्ली मेट्रोचा वापर हजारो महिला दररोज करतात. ऑफिस, कॉलेज किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी मेट्रो हे सुरक्षित, जलद आणि सोयीचे साधन मानले जाते. मात्र अशा प्रकारच्या घटना पाहता महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया

ही घटना समोर आल्यानंतर Reddit वर याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. यावर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या. एक युजर म्हणतो, "असे काका नंतर मुलींनाच दोष देतात." दुसऱ्याने लिहिले, "अशा लोकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हायला हवी." काहींनी तर त्या मुलीने आरोपीला चापट मारायला हवी होती, अशी मतप्रदर्शनेही केली.

सध्या तरी या घटनेबाबत दिल्ली मेट्रो अथवा पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असल्याने लवकरच संबंधित यंत्रणा याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे.

महिलांची सुरक्षितता ही केवळ व्यवस्थेची जबाबदारी नसून, प्रत्येक प्रवाशाचीही नैतिक जबाबदारी आहे. अशा विकृत प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई ही काळाची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT