Video Bangalore man stripped and beaten for texting minor esakal
Trending News

Video : ‘दर्शन स्टाईल घटना'! अल्पवयीन मुलीला मेसेज केले म्हणून तरुणाचे अपहरण; नग्न करून बेदम मारहाण, भयानक व्हिडिओ व्हायरल..

Video Young man assaulted for sending obscene messages to minor like actor darshan case: धमकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी एका तरुणाचे अपहरण करून त्याला नग्न करून मारहाण करण्यात आल्याची घटना बंगळुरूमध्ये उघडकीस आली आहे

Saisimran Ghashi
  • धमकीचे मेसेज पाठवल्याने तरुणाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली.

  • या घटनेत कन्नड अभिनेता दर्शन प्रकरणाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली.

  • पोलिसांनी दोषींविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Viral Video : बंगळुरूत पुन्हा एकदा रेणुकास्वामी खून प्रकरणाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला धमकीचे आणि अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका तरुणाचे अपहरण करून त्याचे कपडे काढून निर्वस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह आठ जणांना अटक केली असून मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात हलवण्यात आले आहे.

ही संतापजनक घटना ३० जूनला बंगळुरूच्या उत्तरेस असलेल्या सोलादेवनहल्ली येथील हेसराघट्टा परिसरात घडली. प्राथमिक पोलीस तपासानुसार, पीडित तरुण आणि अल्पवयीन मुलगी काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या प्रेमात होते पण त्यांचे नाते तुटले. त्यानंतर मुलीचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले.

पीडित तरुणाला जेव्हा त्याच्या आधीच्या प्रेयसीच्या नवीन प्रेमसंबंधांबद्दल कळले, तेव्हा त्याने मुलीला धमकी देणारे मेसेज पाठवले. "तुला प्रेमसंबंध ठेवण्याची आणि ते तोडण्याची सवय आहे. आता तुझ्या घरच्यांना याबाबत सांगणार आहे," असे त्याने मेसेजमध्ये म्हटले होते. या मेसेजेसमुळे मुलीने तिच्या नवीन प्रियकराला ही गोष्ट सांगितली. यानंतर मुलीच्या नवीन प्रियकराने अल्पवयीन मुलीसह पीडित तरुणाचे अपहरण केले. त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन त्याचे कपडे काढले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी मुलीच्या नव्या प्रियकराबरोबर इतर सात ते आठ जणांनीही पीडित तरुणाला मारहाण केली.

हल्ल्यादरम्यान, हल्लेखोरांपैकी एकाने कन्नड अभिनेता दर्शन प्रकरणाचा स्पष्टपणे उल्लेख केला. गेल्या वर्षी कन्नड अभिनेता दर्शनची प्रेयसी पवित्रा गौडा हिच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या रेणुकास्वामी नावाच्या तरुणाची अभिनेत्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केल्याचा आरोप आहे. हल्लेखोराने पीडित तरुणाला असेच परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली ज्यामुळे या घटनेची गंभीरता आणखी वाढली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अल्पवयीन मुलीसह आठ जणांना अटक केली आहे. अटकेतील सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. अल्पवयीन मुलीला महिला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे. ही घटना समाजातील वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आणि कायदेशीर व्यवस्थेच्या धाकातून सुटणाऱ्या मानसिकतेवर प्रकाश टाकते.

FAQs

  1. ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली?
    ३० जूनला बंगळुरूच्या हेसराघट्टा परिसरात ही घटना घडली.

  2. तरुणाला का मारहाण करण्यात आली?
    अल्पवयीन माजी प्रेयसीला अश्लील व धमकीचे मेसेज पाठवल्यामुळे त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली.

  3. पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे?
    पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह आठ जणांना अटक केली असून, सखोल तपास सुरू आहे.

  4. ही घटना दर्शन प्रकरणाशी कशी संबंधित आहे?
    यापूर्वी अभिनेता दर्शन प्रकरणातही अशाच प्रकारच्या मेसेजमुळे हिंसाचार व हत्या घडल्याची घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran–Israel war: इराणवरील हल्ल्यात एक हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू; सरकारने दिली सर्व माहिती

अखेर तो क्षण येणार! पारू अन् आदित्यचं लग्न होणार; पूजेच्या दिवशी मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, वाचा पुढे काय होणार

School Education : अखेर बोडखा येथे नववीचा वर्ग सुरू; सकाळच्या वृत्ताने उडाली होती खळबळ

Karad News : सहकार खात्याचे लेखी उत्तर म्हणजे मागण्यांबाबत टोलवाटोलवी; गटसचिवांचा आरोप

Dog Saves Mandi Villagers : केवळ एका कुत्र्यामुळे वाचला हिमाचलमधील ६० पेक्षा जास्त गावकऱ्यांचा जीव, जाणून घ्या कसा?

SCROLL FOR NEXT