viral video shows father risking daughters life for Instagram reel on dam esakal
Trending News

Video : आई-बापानं मुलीला बसवलं मृत्यूच्या उंबरठ्यावर; धरणाच्या पूलावरून चिमुकलीचा जीव....धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

viral video shows father risking daughters life for Instagram reel on dam : राजस्थानमधील बरैथा धरणावर एका वडिलांनी रीलसाठी चिमुकल्या मुलीचा जीव धोक्यात घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Saisimran Ghashi
  • राजस्थानमध्ये एका वडिलांनी रीलसाठी मुलीचा जीव धोक्यात घातला.

  • धरणावर उंच पुलावर मुलीला बसवतानाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • समाजमाध्यमांवरील प्रसिद्धीसाठी होणारे हे प्रकार आता चिंतेची बाब बनली आहे.

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीजण कोणत्याही टोकाला जातात हे आजवर आपण अनेक वेळा पाहिले आहे. मात्र यावेळी प्रसिध्द होण्याच्या हव्यासापायी एका वडिलांनी स्वतःच्या चिमुकल्या लेकीचाच जीव धोक्यात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील बरैथा धरणावर चित्रीत झालेल्या या व्हिडीओने सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

ही घटना ४ जुलैला घडली. रुडावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बरैथा धरणावर उमा शंकर नावाचे व्यक्ती आपल्या पत्नी आणि चिमुकली मुलगीसह गेले होते. तेथे त्यांनी एक धक्कादायक निर्णय घेत रीलसाठी मुलीला उंच आणि धोकादायक लोखंडी सळीवर बसवले. ही सळी धरणावरच्या पुलाच्या कडेला होती, जिच्याखाली जोरात वाहणारे पाणी होते. या ठिकाणी कुठलीही सुरक्षाव्यवस्था नव्हती, ना कुठला सेफ्टी गिअर.

सदर व्हिडीओत स्पष्टपणे दिसते की, उमा शंकर आपल्या मुलीला त्या अरुंद आणि असुरक्षित ठिकाणी जबरदस्तीने बसवत आहेत. पाठीमागे उंच उभा पूल आणि खाली खोल पाण्याचा प्रवाह असतानाही त्यांनी मुलीला "कॅमेरात बघ" अशी सूचनाही दिली. या प्रकाराचा व्हिडीओ बघून अनेकांनी डोळे दिपले आहेत. मुलीची आईही या सगळ्या प्रकारात हजर होती, परंतु तिनेदेखील पतीला रोखण्याचा कुठलाही प्रयत्न केल्याचे दिसत नाही.

या सगळ्या घटनेचा व्हिडीओ उमा शंकर यांनी स्वतः त्यांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र, सोशल मीडियावर तुफान टीका झाल्यानंतर त्यांनी तो डिलीट केला आहे. सध्या हा व्हिडीओ @jist.news या अकाऊंटवरून पुन्हा व्हायरल होत आहे. स्थानिक पोलीस देखील या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे समजते.

या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "प्रसिद्धीच्या नशेने माणूस इतका आंधळा होतो का?" असा सवाल अनेकांनी विचारला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याचा हव्यास इतका प्रचंड झाला आहे की अनेकदा लोक आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात घालायला मागेपुढे पाहत नाहीत.

हा व्हिडीओ केवळ एका कुटुंबाच्या चुकीचा निषेध नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक जागरूक करणारा इशारा आहे. रीलच्या नादात आपण कुठे जात आहोत, याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. नाहीतर अशा व्हायरल क्षणांना अचानक आयुष्यभरासाठी पश्चात्तापाचे रूप येऊ शकते.

FAQs

  1. हा प्रकार नेमका कुठे घडला?
    हा धक्कादायक प्रकार राजस्थानमधील बरैथा धरणावर घडला.

  2. व्हायरल व्हिडीओत काय दिसते?
    वडील चिमुकल्या मुलीला पुलावर असलेल्या धोकादायक लोखंडी सळीवर बसवत आहेत.

  3. या व्हिडीओवर लोकांची काय प्रतिक्रिया आहे?
    सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून वडिलांच्या वागणुकीचा निषेध केला जात आहे.

  4. पोलीस कारवाई झाली आहे का?
    सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीशांना साकडं; पत्र देऊन व्यक्त केली नाराजी...

Thane Politics: भाजपचे विकास म्हात्रेंचा युटर्न! वरिष्ठांनी मनधरणी करताच गैरसमज दूर

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Indian Railway: गणेशोत्सवाचे आरक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करा, रेल्वेकडे प्रवासी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT