Shocking video mother dumps baby in middle of road esakal
Trending News

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Viral Video Mother leaves baby on road : रस्त्यावर आईने पोटच्या बाळाला सोडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार खरा की बनावट यावर सध्या वाद सुरू आहेत.

Saisimran Ghashi
  • सोशल मीडियावर एका आईने बाळाला रस्त्यावर सोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • काहींचा दावा आहे की हा व्हिडीओ AI द्वारे बनवलेला आहे.

  • प्रेक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया व भावनिक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

Viral Video : आई आपल्या बाळावरचं प्रेम हे कोणत्याही भाषेत व्यक्त करता येणार नाही इतकं खोल, नितळ आणि निस्सीम असतं. बाळ जन्मालाही आलं नसलं तरी ते पोटात असतानाच आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असते. त्यामुळे जर हीच आई एखाद्या क्षणी आपल्या लहानग्याकडे पाठ फिरवते, त्याला जगाच्या दयेवर सोडते, तर असा प्रसंग पाहणाऱ्याला देखील हादरायला होतं.

सध्या सोशल मीडियावर एक असा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही सुन्न व्हाल. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या हसऱ्या चेहऱ्याने बाळाला कुशीत घेऊन रस्त्यावरून येते आणि अचानक रस्त्याच्या मध्यभागी थांबलेल्या गाडीपाशी जाऊन त्या बाळाला जमिनीवर ठेवते. पुढच्याच क्षणी ती स्वतः गाडीत बसते आणि निघून जाते. तिच्या मागे गाडीतून एक कुत्रा खाली उतरतो आणि बाळाजवळ बसतो… पण आई मात्र परत फिरून पाहतही नाही

हा व्हिडीओ @ajit.lavate97 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला अवघ्या काही तासांत तब्बल १६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “किती वाईट गोष्ट आहे… नकोशी झालेली आपली मुलगी रस्त्यावरच सोडून गेली बाई” अशा भावनिक कॅप्शनने हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओ खरा की फसवा?

दरम्यान, हा व्हिडीओ खरा आहे की केवळ एआय (AI) तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आलेला एक बनावट क्लिप आहे, याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. याची पडताळणी करून लवकरच बातमी अपडेट होईल.

काही युजर्स म्हणाले की, “हा केवळ एआयच्या सहाय्याने तयार केलेला सीन आहे,” तर काही युजर्सनी व्हिडीओ पाहून थेट निष्कर्ष काढला “अशांना जीवंत राहण्याचा अधिकार नाही!”

प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहणाऱ्या अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काही युजर्सनी लिहिलं, “आईने अक्षरश: मर्यादाच ओलांडली,” तर एक युजर म्हणतो, “AI असेल तरीसुद्धा ही कल्पनाच पचणारी नाही.” अनेकांनी या व्हिडीओखाली हृदयद्रावक इमोजी आणि रडणारे मेसेज कमेन्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे.

हा व्हिडीओ सत्य असो वा काल्पनिक, पण तो एक गंभीर प्रश्न उपस्थित करतो जर खरंच अशी कोणतीही घटना वास्तवात घडत असेल, तर समाज म्हणून आपली जबाबदारी काय? आई जर आपल्या मुलाला नकोसं समजत असेल, तर त्या आईला मदतीची गरज आहे की शिक्षा?

हा व्हिडीओ आपल्याला केवळ भावनिक धक्का देऊन थांबत नाही, तर पालकत्त्व, नातेसंबंध, आणि समाजातील संवेदनशीलतेविषयी आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.

FAQs

  1. हा व्हिडीओ खरा आहे का?
    अद्याप खात्रीशीर माहिती समोर आलेली नसली तरी अनेकांनी तो एआयने तयार केल्याचा दावा केला आहे.

  2. व्हिडीओमध्ये दिसणारी महिला कोण आहे?
    सध्या त्या महिलेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  3. हा व्हिडीओ कुठे घडला आहे?
    व्हिडीओचे नेमके लोकेशन अद्याप स्पष्ट नाही.

  4. लोकांचा या व्हिडीओवर काय प्रतिसाद आहे?
    लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी व्हिडीओवर भावनिक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT