Jaipur's Spider-Man Goes Viral: Superhero Makes Rotis on Terrace esakal
Trending News

Spiderman Viral Video : स्पायडर-मॅनला देखील लागते भूक; टेरेसवर बसून लाटत होता चपात्या; व्हिडिओ बघाच...

Trending Funny Video of Spiderman: सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल,नेटकऱ्यांनी बांधले प्रशंसेचे पूल

Saisimran Ghashi

Spiderman Viral Video : जयपुरमध्ये रस्त्यावर सुपरहिरो दिसणे आता नवल नाही. तिथले अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण नुकताच समोर आलेला व्हिडिओ मात्र खूपच खास आहे. या व्हिडिओमध्ये जयपूरचा "स्पायडरमॅन" इमारतीच्या टेरेसवर चपाती बनवताना दिसतोय.

jaipur_ka_spiderman या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तो स्पायडरमॅनच्या पोशाखात टेरेसवर बसून अगदी सहजतेने रोट्या बनवून त्या भाजतोय दिसतोय. पण या व्हिडिओमध्ये सर्वात धमाल करणारी गोष्ट म्हणजे, बॅकग्राऊंडला स्पायडरमॅनचे थीम सॉंग. या विचित्र आणि मजेदार संयोजनमुळे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी देखील भरपूर कमेंट्स केल्या आहेत. "स्पायडरमॅनची आई नाही घरी" ही तर सर्वात टॉप कमेंट आहे. अवघ्या तीन दिवसात या व्हिडिओला 16 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज, 1 मिलियन पेक्षा जास्त लाईक्स आणि 14 हजारांहून जास्त कमेंट्स मिळाले आहेत.

Swiggy Instamart या फूड डिलीव्हरी कंपनीने देखील कमेंट करत म्हटलं आहे, "भाई मार्व्हलची चहा पण पीतोय."

एक युजर म्हणतोय, "स्पायडरमॅनची पुढची फिल्म लीक झाली आणि हो, त्याला तरी MJ ची गरज नाहीये."

"With great power comes great responsibility" हा मूळ स्पायडरमॅन चित्रपटातील सुप्रसिद्ध डायलॉग देखील इथे कमेंट मध्ये दिसून येतो.

इतर काही कमेंट्स अशा आहेत, "स्पायडर ब्रो, स्पायडर ब्रो, रोटी कधीपर्यंत करतोस? देशात संकट आहे!"

या व्हिडिओमुळे तरुणाईची मनोरंजनासोबतच सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेचा विनोदी अंदाजात केलेला हा प्रयोग लोकांना खूप आवडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल ट्रेनमधील मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, प्रवाशांना मोठा दिलासा

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

Badamrao Pandit : भाजप प्रवेश होताच माजी आमदार आक्रमक! विजयसिंह पंडित हे अचानक अन् पैशाने झालेले आमदार

Women's World Cup 2025: २० चौकार,४ षटकार... सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेच्या कर्णधाराचं वादळी शतक; विश्वविक्रमही केला नावावर

SCROLL FOR NEXT