Share Market Sakal
Union Budget Updates

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून Share Market च्या नेमक्या काय आहेत अपेक्षा?

शेअर बाजाराला 2021-22 चा अर्थसंकल्प खूप आवडला होता.

शिल्पा गुजर

शेअर बाजाराला 2021-22 चा अर्थसंकल्प खूप आवडला होता.

गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला शेअर बाजार (Share Market) जबरदस्त तेजीत बंद झाला होता. त्याचे कारण म्हणजे शेअर बाजाराला 2021-22 चा अर्थसंकल्प (Budget) खूप आवडला होता. त्यामुळेच शेअर बाजाराने हा अर्थसंकल्प साजरा केला होता. त्यावेळी सेन्सेक्स (Sensex) 2314 अंकांनी चढत 48,600 अंकांवर बंद झाला. निफ्टी (Nifty) 50 देखील 646 अंकांनी वाढून 14,281 अंकांवर बंद झाला. यावेळीही शेअर बाजाराला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. (Budget 2022 Exactly what the share market expects from this years budget)

यंदाच्या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्या तरी महत्त्वाची अपेक्षा म्हणजे सिक्युरिटी ट्रांसॅक्शन टॅक्स (STT) रद्द करावा किंवा कमी करावा अशी शेअर बाजाराची मागणी आहे. याचे कारण लाँग टर्म कॅपिटल गेनच्या जागी (Long Term Capital Gains) त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र, आता शेअर्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर सिक्युरिटी ट्रांसॅक्शन टॅक्स (STT) आकारला जातो. त्यामुळे दोन्ही कर लागू होणे योग्य नसल्याचे शेअर बाजारातील लोकांचे म्हणणे आहे.

सरकारने आर्थिक सुधारणांची (Economic Reforms) प्रक्रिया सुरू ठेवावी, असेही शेअर बाजाराचे मत आहे. यामुळे वाढीसाठी चालना मिळेल. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या अर्थव्यवस्थेचा विकास वाढवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीचा अर्थव्यवस्थेवर सर्वच अर्थानी परिणाम होतो. त्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात. यासोबतच सिमेंट, लोखंडासह अनेक वस्तूंची मागणी वाढते.

वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी अर्थमंत्रीही उपाययोजना करतील, अशी बाजाराची अपेक्षा आहे. सरकारची आर्थिक स्थिती (Fiscal Condition) सुधारल्याने बाजारातून कमी कर्ज घ्यावे लागेल. यामुळे सिस्टममध्ये लिक्विडिटी राहील, ज्यामुळे उद्योग आणि व्यापारासाठी कर्ज महाग होणार नाही. गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वस्त कर्ज मिळणे आवश्यक असल्याचे मत शेअर बाजारातून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताने Asia Cup जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये अफगाणी विद्यार्थ्याने दिल्या 'जय हिंद'च्या घोषणा! Video Viral

JNU Ravan Dahan controversy : उमर खालिद अन् शरजीलचे फोटो पुतळ्यावर लावून 'जेएनयू'मध्ये झाले रावणाचे दहन!

Uddhav Thackeray: राज ठाकरेंसोबत युती आहे की नाही? दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर देत विषयच संपवला, म्हणाले...

World Cup 2025: पाकिस्तानची पहिल्याच सामन्यात दयनीय अवस्था! आधी १२९ वर ऑलआऊट केलं अन् मग बांगालादेशनं गोलंदाजांनाही झोडलं

Talegaon Dhamdhere News : आठवीत शिकणाऱ्या शेतमजुराच्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन संपविले जीवन

SCROLL FOR NEXT