union budget 2023 for education sector 
Union Budget 2026 Updates

Budget 2023 : देशातील विद्यार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; उभारल्या जाणार डिजिटल लायब्ररी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 Update : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला.

यात त्यांनी अनेक क्षेत्रांसाठी विविध मोठ्या घोषणा केल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा सादर होणारा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे.

यावेळी सीतारामन यांनी देशातील लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलासांठीसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन केले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. याशिवाय देशातील विविध भागात 157 नवीन नर्सिंग कॉलेजेसची स्थापन केली जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

तरुणांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध राज्यांमध्ये 30 स्किल इंडिया इंटरनॅशनल सेंटर्सची स्थापना केली जाणार आहे.

लहान मुले आणि तरुणांसाठी देशभरात राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार केल्या जाणार आहे. नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत उघडली जाईल असे सीतारामन म्हणाल्या.

या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना प्रादेशिक आणि इंग्रजी भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध असतील. तसेच वयोमानानुसार पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यासाठी राज्यांना थेट ग्रंथालये बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

एकलव्य निवासी शाळांच्या माध्यमातून आदिवासी मुलांना शिक्षण देणार असल्याचे तसेच शिक्षकांची नियुक्ती आदिवासी विकास मिशनच्या माध्यमातून करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT