Budget 2023  Sakal
Union Budget Updates

Budget 2023 : अर्थमंत्र्यांनी 90 मिनिटांच्या भाषणात 'या' शब्दांचा केला सर्वाधिक उल्लेख

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन अमृतकाळाचे पहिले बजेट असा केला.

सकाळ डिजिटल टीम

Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत वर्ष 2023-24 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला आणि त्याचे वर्णन अमृतकाळाचे पहिले बजेट असा केला.

पाचव्या केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठी भेट दिली आहे. याशिवाय, त्यांनी टॅक्स स्लॅबमधील बदलाबाबत एक मोठी घोषणा केली.

त्यानंतर वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. निर्मला सीतारामन यांनी प्राप्तिकरात सवलत देणार्‍या 90 मिनिटांच्या भाषणात 81 वेळा कर (Tax) , तर उत्पन्न (Income) हा शब्द 58 वेळा वापरला.

निर्मला सीतारामन यांनी कोणत्या शब्दांचा सर्वाधिक उल्लेख केला?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 90 मिनिटांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वात जास्त प्रस्ताव (Proposed) या शब्दाचा उल्लेख 89 वेळा केला. याशिवाय अर्थमंत्र्यांनी टक्केवारीचा (Per Cent) 79 वेळा, कर (Tax) 81 वेळा आणि उत्पन्नाचा (Income) 58 वेळा उल्लेख केला आहे.

निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात लाख कोटी 19 वेळा, कस्टम ड्युटी (Custom Duty) 15 वेळा आणि आयकर (Income Tax) हा शब्द 14 वेळा वापरला.

आयकर संदर्भात अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली :

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर स्लॅब जाहीर केले, ज्या अंतर्गत नवीन प्राप्तिकर प्रणाली अंतर्गत वार्षिक 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

त्या म्हणाल्या, 'सध्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही. मी नवीन कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा 7 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

नवीन कर प्रणाली डीफॉल्ट कर प्रणाली बनवण्यात आली आहे. 2020 मध्ये लागू करण्यात आलेले 6 आयकर स्लॅब बदलून 5 करण्यात आले. आयकर मूळ सूट 3 लाख रुपये असेल. आता नवीन कर प्रणालीमध्ये स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT