budget 2022 Sakal media
Union Budget 2026 Updates

अर्थसंकल्प : दमणगंगा,पिंजाळ नदी जोड प्रकल्पाद्वारे शिवसेनेला शह ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पासाठी (Damanganga-pinjal river link project) 2014 मध्ये या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली होती. केंद्राच्या नदी जोड प्रकल्पात या प्रकल्पाचा समावेश असून 2017 नंतर त्याचा आता केंद्रीय अर्थसंकल्पात (union budget 2022) उल्लेख करण्यात आला आहे. 2015 च्या अंदाजानुसार या प्रकल्पासाठी 3 हजार कोटीहून अधिकचा खर्च आहे.

दमणगंगा पिंजाळ जोड प्रकल्पातून मुंबईला 1 हजार 865 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार होते.तर,महामुंबईसाठीही पाणी उपलब्ध होणार होते. यासाठी दमणगंगा नदीवर धरण बांधून पाणी अडवले जाणार होते. त्यानंतर जलबोगद्यातून हे पाणी प्रस्तावित पिंजाळ प्रकल्पात आणण्यात येणार होते.या प्रकल्पाची चर्चा 2014 पासून सुरु आहे.त्याचा प्रकल्प आराखडाही 2015 मध्ये तयार करण्यात आला होता. त्यानुसार 3 हजार कोटीहून अधिकचा खर्च या प्रकल्पासाठी आहे. केंद्रीय अर्थसकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज चार नदी जोड प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यात या प्रकल्पाचाही उल्लेख आहे.

शिवसेनेला शह

गारगाई पिंजाळ असे धरण प्रकल्प बाजूला ठेवून महानगर पालिकेने गाेराई येथे समुद्राचे पाणी गोेडे करण्याच्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.त्यामुळे दिल्लीतून राज्य सरकारला शह देण्यासाठी या नदी जोड प्रकल्पाची घोषणा करण्यात आली का अशी चर्चा सुरु आहे.

महानगर पालिकाच्या निवडणुका

महामुंबईतील नवी मुंबई,मुंबई ही दोन शहरे सोडली तर इतर शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. या वर्षात मुंबईसह या महानगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत.त्यामुळे दिल्लीतून थेट या शहरांची पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे चित्र निर्माण केले जात असावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT