NIrmala Sitharaman Sakal
Union Budget 2026 Updates

Economic Survey 2022-23 : अर्थमंत्र्यांकडून सर्वेक्षण सादर; इतका असणार GDP

सर्व्हेक्षणात 2023-24 मध्ये 6.5% वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Economic Survey 2022-23 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून त्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने झाली आहे.

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लगेचच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी खासदार लोकसभेत पोहोचले. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. सादर करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात 2023-24 मध्ये देशाचा आर्थिक विकास दर 6.5% राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जगभरात मंदीचे सावट असतानाही भारताचा आर्थिक विकास दर पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये 6.5% राहील असे सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. 

आर्थिक सर्व्हेक्षणात नेमकं काय?

आर्थिक सर्वेक्षणात 2022-23 मध्ये आर्थिक विकास दर 7 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 2021-22 चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला तेव्हा 2022-23 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 8 ते 8.5 टक्के दराने वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

युक्रेन आणि रशियामधील युद्ध आणि जागतिक आर्थिक संकटामुळे आर्थिक विकास दर गेल्या वर्षी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा कमी असू शकतो असे नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT