Union Budget 2025 costlier and cheaper things list esakal
Union Budget Updates

Union Budget 2025 : मोबाईल, EV बाईकसह 'या' 10 वस्तु होणार स्वस्त; अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त? जाणून घ्या

Indian Union Budget 2025 Nirmala Sitharaman on costlier and cheaper things list Announcement : भारतीय अर्थसंकल्प 2025 मध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया.

Saisimran Ghashi

Union Budget 2025 : भारत सरकारच्या 2025 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. त्यांनी यंदा आठव्यांदा भारताचा अर्थसंकल्प मांडला आहे.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले होते. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त झालीत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढले होते. यावेळीच्या अर्थसंकल्पातील घोषणांनुसार काय स्वस्त झाले आणि काय महाग झाले जाणून घेऊया.

काय झाले स्वस्त?

  1. दागिने

  2. इलेक्ट्रोनिक वाहने,

  3. कॅन्सरचा उपचार, वैद्यकीय उपकरणे स्वस्त होणार

  4. एलईडी आणि एलसीडि टीव्ही

  5. लेदरच्या वस्तु

  6. लहान मुलांची खेळणी स्वस्त

  7. भारतात तयार केलेले रेडिमेड कपडे स्वस्त होणार

  8. विमा स्वस्त होणार

  9. मोबाईल फोन स्वस्त

  10. कॅन्सर औषधांवारील कस्टम ड्यूटि हटवण्यात येणार आहे.

  11. 35 जीवनावश्यक औषधे करामधून वगळली आहेत.

काय झाले महाग?

इंपोर्टेड कपडे, घर खरेदी करणे महाग होणार आहे.

त्याचबरोबर यंदाच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्स संबंधित मोठी घोषणा झाली आहे. ज्यांचे उत्पन्न 12 लाख किंवा 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना आयकर भरावा लागणार नाही.

अर्थसंकल्पात विज्ञान-तंत्रज्ञानासह , शैक्षणिक क्षेत्र आणि आरोग्य, पर्यटन, उद्योग यांसह इतर क्षेत्रांसंबंधित महत्वाच्या घोषणा झाल्या. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय कृषी क्षेत्र, तसेच महिला सक्षमीकरणासाठी काही प्रमुख घोषणा झाल्या. हा अर्थसंकल्प देशाच्या आर्थिक वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, विविध क्षेत्रांमध्ये नवे प्रकल्प, सुधारणा आणि विविध योजना सुरू करण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengaluru Theft : बंगळुरूमध्ये RBI अधिकारी बनून 7 कोटींची लूट! सिनेमालाही लाजवेल अशी फिल्मी स्टाइल चोरी

Latest Marathi News Update LIVE : मुंढवा प्रकरणात शीतल तेजवानी यांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू

Feng Shui Turtle: घरी कासव ठेवण्यापूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या, वाढेल बँक बॅलेन्स अन् नोकरीत मिळेल प्रमोशन

Video Viral: टिकी टाका नाही झटपट पटापट... फुटबॉलमधील ला लीगाला सुद्धा लागला डॅनीचा नाद

Latur Extortion Case: डॉक्टरकडे खंडणी मागणारे तिघे अटकेत; लातूर शहरामध्ये कारवाई, एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT