Parliament
Parliament Sakal
Union Budget Updates

भारताचे अर्थमंत्री अन् थेट पाकिस्तानचे पंतप्रधान; कोण होती ती व्यक्ती?

निनाद कुलकर्णी

Budget 2022 : 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) चौथ्यांदा अर्थसंकल्प (Budget 2022-23) सादर करणार आहेत. नोकरदारांपासून शेतकऱ्यापर्यंत, व्यावसायिकांपासून उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच या अर्थसंकल्पाकडून आशा आहेत. अर्थमंत्री आपल्या मागण्या पूर्ण करतील, अशी जनतेला आशा आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला अशा एका अर्थमंत्र्याबद्दल सांगणार आहोत ज्या व्यक्तीने भारतात अर्थसंकल्प सादर केला होता, त्यानंतर ही व्यक्ती पाकिस्तानची पंतप्रधान बनली होती नेमकी कोण होती ही व्यक्ती जाणून घेऊया. ( Indian Finance Minister Became The PM Of Pakistan)

1946 मध्ये स्थापन झाले होते अंतरिम सरकार

1946 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्या नेतृत्वाखाली देशात अंतरिम सरकार स्थापन झाले. या काळात लियाकत अली खान (Liaquat Ali Khan) ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्व करत होते. या अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता. (The Interim Government Was Formed In 1946)

लियाकत अली हे मेरठमधून निवडणूक लढवत होते

लियाकत अली व्यतिरिक्त सरदार पटेल, भीमराव आंबेडकर आणि बाबू जगजीवन राम यांचाही पंतप्रधान नेहरूंच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश होता. अंतरिम सरकारचे अर्थमंत्री म्हणून लियाकत अली खान यांनी 2 फेब्रुवारी 1946 रोजी विधानसभेच्या इमारतीत (आजचे संसद भवन) अर्थसंकल्प सादर केला होता. अविभाजित भारतात लियाकत अली हे उत्तर प्रदेशातील मेरठमधून निवडणूक लढवत असत. मात्र, त्यांचा जन्म अविभाजित पंजाबच्या कर्नालमध्ये झाला होता.

फाळणीनंतर बनले पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान

अंतरिम सरकारमध्ये अर्थमंत्री लियाकत अली खान यांनी त्यांच्या बजेटला 'गरीबांचे बजेट' असे संबोधले होते. अर्थसंकल्पीय प्रस्तावांना 'समाजवादी बजेट' असेही म्हटले जात असे. मात्र, त्यावेळी हा अर्थसंकल्प उद्योग जगताला आवडला नव्हता. 1947 मध्ये 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री देशाची फाळणी झाली आणि स्वातंत्र्यानंतर लियाकत अली खान पाकिस्तानात गेले. लियाकत अली खान हे मुस्लिम लीगचे मोठे नेते होते आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना (Muhammad Ali Jinnah) यांच्याही जवळचे होते. पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यांना पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले.

लियाकत अली खान कोण होते?

लियाकत अली खान हे त्या व्यक्ती म्हणून लक्षात राहतात. ज्यांनी आधी स्वातंत्र्य, नंतर फाळणी (India Pakistan Partition) आणि नंतर फाळणीच्या काळात हिंदू-मुस्लिम संबंधात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांचा जन्म तत्कालीन पंजाबमधील कर्नाल (सध्याचा हरियाणाचा भाग) येथील एका राजघराण्यात झाला होता. नंतरच्या दिवसांत, ते मुझफ्फरनगर, यूपी येथे सक्रिय राहिले, जिथे त्याच्या कुटुंबाला मोठी जामीन मिळाली होती. ते स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान होते. तर ऑल इंडिया मुस्लिम लीगमध्ये मोहम्मद अली हे जिना यांच्यानंतरचे दुसरे उच्चपदस्थ नेते होते. (Who was Liaquat Ali Khan?)

भारतासोबत झाला होता 1950 मध्ये करार

लियाकत अली खान यांनी 14 ऑगस्ट 1947 ते 16 ऑक्टोबर 1951 पर्यंत पाकिस्तानचे (Pakistan Prime Minister) पंतप्रधान म्हणून काम केले. 16 ऑक्टोबर 1951 रोजी एका सभेतील भाषणादरम्यान त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान असताना त्यांनी 1950 मध्ये भारताशी करार केला होता. या करारात दोन्ही देशांतील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबाबत सांगण्यात आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi on Thackeray: 'नकली संतान' उद्धव ठाकरेंवरून मोदींचा यूटर्न, नेमकं काय म्हणाले होते? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : शरद पवारांची वडगावशेरी भागातील सभा रद्द

Share Market Closing: शेअर बाजाराने घेतला सुटकेचा निश्वास; 5 दिवसांनंतर निफ्टी वाढीसह बंद, कोणते शेअर्स तेजीत?

सोलापुरात आज शून्य सावली दिवस; वर्षात दोनवेळाच अशी स्थिती; खगोलप्रेमींना निरीक्षणाची संधी

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

SCROLL FOR NEXT