Union Budget 2022 Nirmala Sitharaman Capital Expenditure  esakal
Union Budget 2026 Updates

Union Budget 2022: केंद्र सरकार पायभूत सुविधांवर खर्च करणार १०.६८ लाख कोटी रूपये

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत आर्थिक वर्ष २०२२-२३ चा अर्थसंकल्प (Union Budget 2022 Highlights) सादर केला. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी अनेक नव्या योजनांची घोषणा केली. याचबरोबर पायाभूत सुविधांसाठी देखील मोठी तरतूद केल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की केंद्र सरकार २०२२-२३ या आर्थिक वर्षात जवळपास १०.६८ लाख कोटी रूपये विविध पायाभूत सुविधांवर (Capital Expenditure) खर्च केले जाणार आहेत.

निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय (Nirmala Sitharaman Budget 2022) भाषणात सांगितले की, २०२२-२३ आर्थिक वर्षात २५ हजार किलोमिटर राष्ट्रीय महामार्ग विस्तारिकरण उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, केन बेटवा लिंकिंग प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी जवळपास ४४ हजार ६०५ कोटी रूपयांचा तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा जवळपास ९ लाख हेक्टर शेतजमिनीला होणार आहे. तसेच ६२ लाश लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या प्रोजेक्टद्वारे १०३ मेगा वॅट हायड्रोपावर प्रकल्पही सुरू होईल. याचबरोबर २७ मेगावॅट सौर उर्जा तयार करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १४०० कोटी रूपयांची तरतूद देखील केली आहे.

तसेच संरक्षण क्षेत्रात देखील स्वदेशीचा नारा बुलंद करण्यात येणार आहे. (Defense Budget 2022 News Update) संरक्षण खरेदी बजेटमधील ६८ टक्के रक्कम ही स्वदेशी बाजारात खर्च केली जाणार आहे. संरक्षण बजेटमधील आयातीवरचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न यंदाच्या आर्थिक वर्षात केला जाईल. यामुळे आत्मनिर्भर भारत योजनेला बळ मिळणार असे निर्माला सीतारमण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT