Union Budget Updates esakal
Union Budget 2026 Updates

Union Budget : अर्थसंकल्पात व्यापार-उद्योगाला दिलासा देण्याचा प्रयत्न; अर्थमंत्र्यांनी कशामध्ये केली तरतूद?

Union Budget 2023 : आज अर्थसंकल्प 2023-24 सादर केला जात आहे. आज सर्वांच्या नजरा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडं लागल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अर्थसंकल्पात सीतारामन यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

Union Budget 2023 : आज अर्थसंकल्प 2023-24 सादर केला जात आहे. आज सर्वांच्या नजरा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडं लागल्या आहेत. त्या सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत.

या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी व्यापार आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. निर्मला सीतारमण यांनी सरकार सात विषयांवर लक्ष केंद्रित करणार असून त्याचं विश्लेषण केलं आहे. सर्वसमावेश विकास, वंचित घटनांना प्रधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमता विस्तार, हरित विकास, युवक, आर्थिक क्षेत्राचा विकास असा आहे.

दरडोई उत्पन्न दुपटीनं वाढून 1.97 लाख रुपये झाले आहे. या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे. या अर्थसंकल्पात मत्स विकासासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचं लक्ष्य 20 लाख कोटी रुपये केलं जाईल. तर पायाभूत सुविधांसाठी तब्बल 10 लाख कोटी रुपयांपर्यंत खर्च करणार असून पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चात ३३ टक्क्यांची वाढ करणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

भांडवली गुंतवणुकीत 33 टक्क्यांनी वाढ करून ती 10 लाख कोटींपर्यंत नेण्यात आली आहे. ही रक्कम एकूण जीडीपीच्या 3.3 टक्के आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.

छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम 1 एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी 9 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा 2 लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होणार आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ आणि जीआय उत्पादने आणि इतर हस्तकलेच्या जाहिराती आणि विक्रीसाठी राज्यांच्या राजधानीत किंवा राज्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळी ‘युनिटी मॉल’ उभारण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. याशिवाय, युवकांना जागतिक स्तरावर नोकऱ्या मिळण्यासाठी ३० केंद्र उभारली जाणार आहेत. लघू आणि सूक्ष्म उद्योगांसाठी 2 हजार कोटींचं कर्ज वाटप केलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT