Budget cheaper and costlier things list Esakal
Union Budget Updates

Union Budget 2024: काय स्वस्त, काय महाग? निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते होणार नाराज, बजेटमध्ये काय आहे जाणून घ्या

Nirmala Sitharaman: याशिवाय सरकारने आता सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के केली आहे. यानंतर सोन्या-चांदीच्या किमती खाली येतील.

आशुतोष मसगौंडे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढणारही आहेत.

गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये टीव्ही, स्मार्टफोन, कॉम्प्रेस्ड गॅस आणि प्रयोगशाळेतील हिरे इत्यादींच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. तर सिगारेट, विमान प्रवास आणि कापडाच्या किमती वाढल्या होत्या.

आता यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने कोणत्या गोष्टी स्वस्त आणि कोणत्या गोष्टी महाग केल्या ते जाणून घेणार आहोत.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मोबाईल आणि मोबाईल चार्जरसह इतर उपकरणांवरील BCD 15% ने कमी केले आहे.

याशिवाय सरकारने आता सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी 6 टक्के केली आहे. यानंतर सोन्या-चांदीच्या किमती खाली येतील.

याशिवाय लेदर आणि फुटवेअरवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. दुसरीकडे, दूरसंचार उपकरणे महाग झाली आहेत, त्यावरील कस्टम ड्युटी 15% करण्यात आली आहे.

काय झाले स्वस्त?

  • सोने आणि चांदी स्वस्त होणार

  • प्लॅटिनमवर कस्टम ड्युटी कमी केली

  • कर्करोग औषधे

  • मोबाइल चार्जर

  • चामड्याच्या वस्तू

काय झाले महाग?

स्फोटक बनवण्यासाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट अधिक महागणार आहे. याशिवाय, राजकीय आणि व्यावसायित जाहिरातींसाठी वापरल्या जाणाऱ्या फ्लेक्स किंवा बॅनरवरील कस्टम ड्युटी आणखी महाग होईल कारण त्यावरील बीसीडी 10 टक्क्यांवरून 25 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT