Budget 2024  esakal
Union Budget Updates

Budget 2024 : फक्त दोनच राज्यांना निधी का? महाराष्ट्रातून होणाऱ्या टीकेला निर्मला सीतारामन यांचं उत्तर

Nirmala Sitharaman Latest News : ''जर एखाद्या राज्याच्या नावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नसेल तर अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा त्या राज्यांना लाभ होत नाही, असं होत नाही. अर्थसंकल्पातील योजनांचा समान लाभ सर्व राज्यांना मिळतो. त्यामुळे विरोधकांचा प्रचार चुकीचा आहे.''

संतोष कानडे

Nirmala Sitharaman: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरुन देशभरातून विरोधक टीका करत आहे. केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशला भरघोस निधी दिल्यावरुन सरकारला धारेवर धरलं जातंय. त्यावर बुधावरी अर्थमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचं नाव घेता येईलच असं नाही. जूनमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदराला मंजुरी दिली होती. या बंदरासाठी ७६ हजार कोटीची मंजुरी दिली आहे. मात्र, फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी दिला नाही किंवा महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलं जात आहे.

जर एखाद्या राज्याच्या नावाचा अर्थसंकल्पात उल्लेख नसेल तर अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांचा त्या राज्यांना लाभ होत नाही, असं होत नाही. अर्थसंकल्पातील योजनांचा समान लाभ सर्व राज्यांना मिळतो. त्यामुळे विरोधकांचा प्रचार चुकीचा आहे असं सीतारामन म्हणाल्या.

बिहारला काय मिळालं?

अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली. बिहारच्या गयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही केंद्र सरकार सहकार्य करणार आहे. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल बांधला जाणार आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

याशिवाय बिहारमधील पीरपेंटी येथे नवीन 2400 मेगावॅट ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय महाविद्यालये आणि क्रीडा पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. बहुपक्षीय विकास बँकांकडून बाह्य सहाय्यासाठी बिहार सरकारच्या विनंत्यांची विचार केला जाणार आहे.

आंध्र प्रदेशला काय मिळालं?

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशलाही मोठा भेट दिली आहे. पुनर्रचनेच्या वेळी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आंध्र प्रदेशसाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेश पुनर्रचना कायद्यात राज्याच्या भांडवलाची गरज मान्य केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT