Nirmala Sitharaman ANI
Union Budget Updates

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय? अर्थमंत्री म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसने केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उल्लेख केला होता.

केंद्रीय अर्थसंकल्प (Budget) सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पत्रकाराने याच मुद्यावर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केलंत असा प्रश्न विचारला. तेव्हा उत्तर देताना हा मुद्दा राज्याच्या अधिकारात येत असल्याचं सांगत राज्यावर ढकललं.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसदर्भात केंद्राने काय केलं असं निर्मला सीतारामन यांना विचारण्यात आलं होतं. त्याआधी पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाच्या डोक्यावर छत देणार अशी घोषणा केली. मग आता ८० लाख घरांच्या योजनेची घोषणा करण्यात आलीय. आता हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कोरोनामुळे अनेक योजना प्रभावित झाल्या आहेत. हळू हळू हे प्रोजेक्ट पूर्ण करण्यात येत आहेत अशी माहिती देशाचे अर्थ सचिव टी. व्ही सोमनाथन यांनी सांगितलं. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्याकडे बोट दाखवलं आहे.

शेतकऱ्यांच्या प्रकरणात राज्याची भूमिका महत्त्वाची आहे. महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर आधीचं बोलणं हे काँग्रेसने केलेल्या टीकेबाबतीत झालं त्या संदर्भात मी बोलले. कृषी क्षेत्रासाठी राज्य सरकार जबाबदार आहे. पण नेहमी फक्त आमच्यावरच निशाणा साधला जातो. आम्ही जेव्हा यादी करतो की शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं तेव्हा राज्याच्या जबाबदारीसंदर्भात मी विचारेन असंही निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

आधी काय म्हणाल्या होत्या सीतारामन?

राहुल गांधींनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसची ज्या काही एक दोन राज्यात सत्ता आहे तिथल्या परिस्थितीवर बोट ठेवले. पंजाबमध्ये रोजगारनिर्मिती ठीक आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसंच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रात आत्महत्या आजही होत आहेत. त्या रोखल्या जातायत का राहुल गांधींकडून? त्यामुळे कोणत्याही विषयावर बोलण्याआधी त्यांनी महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये करून दाखवावं असंही आव्हान त्यांनी दिलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Ragi Choco Lava Balls Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा 'रागी चोको लाव्हा बॉल्स', रविवार होईल खास

Panchang 20 July 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

आजचे राशिभविष्य - 20 जुलै 2025

घरात गुंतलं मन...

SCROLL FOR NEXT