10 homeless families due to encroachment Sailila developers gave 500 square feet land esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अतिक्रमणात बेघर 10 कुटुंबीयांना घरासाठी 500 स्क्वेअरफूट जागा

सकाळ वृत्तसेवा

शिंदखेडा (जि. धुळे) : शिंदखेडा शहरातील विरदेल रोडवरील अतिक्रमण चार महिन्यांपूर्वीच ऐन दिवाळीतच काढण्यात आले होते.

परिसरातील अनेक कुटुंबीयांचा (Family) संसार उघड्यावर आला होता. (10 families homeless due to encroachment Sailila developers gave 500 square feet land for house Dhule News)

गरजू अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन साईलीला डेव्हलपर्सचे संचालक दीपक देसले व संजय शहा यांनी दिले होते. त्यानुसार दहा कुटुंबीयांना निवासासाठी प्रत्येकी ५०० स्क्वेअरफूट जागा उपलब्ध करून देण्यात आली. बेघर झालेल्या कुटुंबांना ही जागा देण्यात आली. या वेळी या दहाही कुटुंबीयांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.

गरजू गरीब कुटुंबातील दहा लाभार्थ्यांना प्रत्येकी ५०० स्क्वेअरफूट जागा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी नगरपंचायत प्रशासक प्रशांत बिडगर यांनी सहकार्य करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. दहाही कुटुंबीयांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून देत त्यांचे हक्काचे घर मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश देसले, दीपक अहिरे, प्रा. सतीश पाटील, विधिज्ञ नीलेश देसले यांनी मनोगत व्यक्त केले. बेघर कुटुंबीयांकडून यश मराठे यांनी मनोगत व्यक्त करीत साईलीला डेव्हलपर्सचे संचालक यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हाजी शेख करीम अध्यक्षस्थानी होते.

पोलिस निरीक्षक सुनील भाबड, माजी नगरसेवक सुनील चौधरी, धर्मराज पाटील, गिरीधर वाघ, गिरीश देसले, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपक देसले यांनी प्रास्ताविक केले. नीलेश देसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : १२ आत्मनिर्भर भारतासाठी देशाची क्षमता वाढवणे गरजेचे

El Nino Alert : पुढील वर्षाच्या मॉन्सूनबाबत हवामान विभागाचे मोठे संकेत! प्रशांत महासागराचे तापमान होणार कमी; 'एल निनो' ओसरणार? 'नोआ'च्या अहवालाने वाढवली चिंता

Census 2026: जनगणनेसाठी ४० प्रश्‍नांची सूची; स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातिगणनाही होणार

ASIA CUP 2026: जेमिमा रॉड्रिग्स आशिया कप आणि आशियाई खेळांमधून बाहेर; BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ धडाकेबाज फलंदाजाला मिळाली संधी

शहर हद्दीतही दोन्ही बाजूला ३० मीटरचेच बंधन! महामार्गांलगतच्या हॉटेल, ढाब्यांवर ६० दिवसांत हातोडा; जिल्हाधिकाऱ्यांकडून ‘कृती दल’ स्थापन, वाचा...

SCROLL FOR NEXT