Teachers award sakal
उत्तर महाराष्ट्र

Teacher Award : खानदेशातील 10 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

सकाळ वृत्तसेवा

Teacher Award : समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्याच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्यातील १०८ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले.

यात खानदेशातील नऊ शिक्षकांचा समावेश आहे. सन्मानपत्र आणि प्रत्येकी एक लाख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे पुरस्कार घोषित झाले. (10 teachers from Khandesh announced State Adarsh ​​Teacher Award jalgaon dhule nandurbar news)

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांत धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांची वर्णी लागली आहे. यात धुळे जिल्ह्यातील निकुंभे शाळेतील गोकुळ त्र्यंबक पाटील, खंबाळे येथील आर. सी. पटेल विद्यालयातील संजय दगाजीराव पाटील व धोंगडेदिगर येथील वैशाली प्रभाकर सोनवणे या शिक्षकांचा समावेश आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील बोडीपाडा येथील पंकज गोरख भदाणे, तळोदा येथील रवींद्र गुरव व लोंधा येथील रोहिणी गोकुळराव पाटील या शिक्षकांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील कंडारी येथील डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील, भडगाव येथील सीमा भास्कर सैंदाणे, यावल येथील कल्पना देवीदास माळी व जवखेडे येथील छगन पंढरीनाथ या शिक्षकांना पुरस्कार घोषित झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वर्गवारीनुसार मिळालेल्या शिक्षकांची संख्या :

प्राथमिक शिक्षक - ३७

माध्यमिक शिक्षक - ३९

आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक - १९

आदर्श शिक्षिका - ०८

विशेष शिक्षक - ०२

दिव्यांग शिक्षक - ०१

स्काउट-गाइड - ०२

एकूण आदर्श शिक्षक ः १०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं-चांदी सुसाट! जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे MCX बाजारात सोनं २ हजारांनी महागलं; मकर संक्रांतीला भाव कमी होणार?

ट्रम्प व्हेनेझुएलाचे काळजीवाहू राष्ट्रपती, स्वत:च शेअर केला फोटो; काय म्हणाले?

IND vs NZ 1st ODI : भारताला मोठा धक्का! रिषभ पंतनंतर आणखीन एका सुपरस्टारची मालिकेतून माघार; वर्ल्ड कपपूर्वी वाढली चिंता

Stray Dog Killing Telangana : धक्कादायक घटना ! तीन दिवसांत ३०० भटक्या कुत्र्यांची हत्या, सरपंच अन् ग्रामसचिवाने लावली विल्हेवाट

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

SCROLL FOR NEXT