12 crore sanctioned for access road dhule news
12 crore sanctioned for access road dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: धुळ्यात प्रवेश रस्त्यास 12 कोटींचा निधी मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील प्रकाश थिएटर परिसरातील नाल्यापासून तर पारोळा चौफुलीपर्यंतचा रस्ता विकसित व्हावा अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. (12 crore sanctioned for access road dhule news)

त्याची दखल घेत माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रदीप कर्पे यांनी घेतली. त्यांच्या अथक पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने भरीव १२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

प्रकाश थिएटर परिसरातील नाल्यापासून तर पारोळा चौफुलीपर्यंतचा रस्ता अहोरात्र वर्दळीचा आहे. जळगावमार्गे धुळे शहरात प्रवेशाचा मुख्य मार्ग आणि शहरातील बाजारपेठेला जोडणारा हा मार्ग आहे. त्याचे नूतनीकरण व्हावे, अशी मागणी होती.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

ते लक्षात घेत खासदार भामरे, श्री. अग्रवाल आणि महापौर असताना श्री. कर्पे यांनी शासनाशी पत्रव्यवहार सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याअंती शासनाने अर्थसंकल्पातून भरीव १२ कोटींचा निधी मंजूर केला.

याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सहकार्य लाभले, असे श्री. कर्पे यांनी सांगितले. निविदा प्रक्रियेनंतर महिन्याने या रस्त्याचे काम सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT